आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

कुटुंब चालवण्यासाठी सुरु केलेल्या पोल्ट्रीफार्म मधून लाखोंची कमाई करतेय ही महिला….!


 

जे कठीण परिस्थितीत हार मानत नाहीत ते एक दिवस यशस्वी होतात. अशीच एक गोष्ट उत्तर प्रदेशातील गोरखपूरच्या निर्मलाची आहे. कुटूंबाचे पालनपोषण करण्यासाठी पोल्ट्रीफार्म सुरू केले. आज या व्यवसायाच्या माध्यमातून लाखो रुपयांचा नफा कमवत आहेत. कधीकाळी गरिबीचे जीवन जगणाऱ्या निर्मला आता एक यशस्वी उद्योजिका म्हणून पुढे आल्या आहेत.

पोल्ट्रीफार्म

गोरखपूरच्या पचौरी गावात राहणारी निर्मला आर्थिक संकटात सापडली होती. अगदी कुटुंबाच्या संगोपनातही एक संकट होते.  अशा परिस्थितीत कुटुंबातील पुरुष कमावण्यासाठी इतर शहरात गेले. पण घराच्या आर्थिक स्थितीत कोणतीही सुधारणा झाली नाही.

अशा परिस्थितीत निर्मला स्वत: कामाच्या शोधात बाहेर पडली.  यावेळी त्यांना राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशनची माहिती मिळाली. घेतलेल्या या माहितीनंतर त्यांनी बचत गट सुरू केला.  या गटात तिने इतर गावातील महिलांचा देखील समावेश केला.

 पोल्ट्रीफार्म

 

तीन वर्षांपूर्वी निर्मलाने 50 हजार रुपयांचे कर्ज घेऊन  स्वत: चे पोल्ट्री फार्म सुरू केले. वर्षभर सतत मेहनत घेतल्यानंतर त्याचा व्यवसाय व्यवस्थित चालू लागला. त्यांच्याबरोबर पोल्ट्री फार्म व्यवसायात आलेल्या महिलांना उत्पन्नाचा चांगला स्रोत मिळाला आहे.

अथक परिश्रमानंतर आता हा गट या कामात सुमारे तीन ते चार लाखांचा नफा कमवत आहे. यामुळे निर्मलासमवेत या महिलांचे जीवनही सुधारले आहे. केवळ जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर निर्मला यांनी उद्योग व्यवसायात आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

प्रेरणादायी! पायाने दिव्यांग असलेली ही युवती रिक्षा चालवून आपल्या वृध्द आईवडिलांचा सांभाळ करतेय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here