Reading Time: 3 minutes

आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये हे आहेत सर्वाधिक धावा करणारे 5 खेळाडू: यादीत एकच भारतीय खेळाडू


 

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाईल. दोन्ही संघ पॉइंट टेबलमध्ये पहिल्या आणि दुसर्‍या स्थानावर आहेत. भारत या यादीत 5 मालिका जिंकत 490 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे तर तीन मालिका जिंकून न्यूझीलंड 420 गुणांसह दुसर्‍या स्थानावर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या पाच खेळाडूंच्या कामगिरीवर एक नजर टाकूया.

मार्नस लाबुशेन

स्टीव्ह स्मिथच्या जागी मार्नस लाबुशेन ऑस्ट्रेलियन खेळाडूला पर्यायी म्हणून संघात घेण्यात आले होते, परंतु लवकरच या खेळाडूने क्रिकेटमधील आपली कौशल्य सिद्ध करून संघात स्थान पक्के केले. लबुशेनने स्वत: ला विशेषतः या कसोटीत सिद्ध केले आहे की तो या रूपात महान खेळाडू आहे.

 

त्याने टेस्ट चँपियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नोंदविला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 13 सामन्यांच्या 23 डावांमध्ये 72.82 च्या सरासरीने लबुशेनने शानदार 1675 धावा केल्या असून लबुशेनने सर्वाधिक 215 धावा केल्या आहेत. या चॅम्पियनशिपमध्ये 5  शतके आणि 9 अर्धशतकेही आहेत.

 चॅम्पियनशिप

जो रुट

इंग्लंडचा कसोटी संघाचा कर्णधार जो रूटने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्याची सरासरी पाहिली गेली तर या खेळाडूने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात अनुक्रमे 49.2 आणि 50 च्या सरासरीने  धावा केल्या आहेत.

रूटने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या 20 सामन्यांच्या 37 डावांमध्ये 47.42 च्या सरासरीने 1660 धावा केल्या आहेत, ज्यात रूटने 3 शतके आणि 8 अर्धशतके ठोकली आहेत, रूटने आपल्या कारकीर्दीत 103 कसोटी सामने खेळले आहेत ज्यात या इंग्लिश खेळाडूने 49.2 च्या सरासरीने 8617 धावा पूर्ण केल्या आहेत. रुट एकदिवसीय क्रिकेटमध्ये 6000 धावांच्या जवळपास आहे.

स्टीव्ह स्मिथ

चॅम्पियनशिप

स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचा एक महान खेळाडू आहे. विशेषतः स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये जे स्थान मिळवले. त्यावरून लक्षात येते की स्टीव्ह स्मिथ हा कसोटी क्रिकेटमधला जगातला नंबर वन खेळाडू आहे. स्टीव्हने फक्त  77 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने सुमारे 7540 धावा केल्या आहेत.  याशिवाय स्मिथने टेस्ट चॅम्पियनशिपच्या 13  सामन्यात. 63.85 च्या सरासरीने 1341 धावा केल्या आहेत, त्यामध्ये 4 शतके आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे. टीम इंडियाच्या विराट कोहलीसोबत स्मिथची तुलना केली जात असली तरी स्मिथ या फॉर्मेटमध्ये विराटपेक्षा पुढे आहे.

बेन स्टोक्स

इंग्लंडच्या बेन स्टोक्सने गेल्या दोन-तीन वर्षांत ज्या प्रकारचे क्रिकेट खेळला आहे त्यावरून तो जगातला सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे हे सिद्ध झाले आहे. या खेळाडूने क्रिकेटच्या सर्व स्वरूपात जबरदस्त कामगिरी केली आहे. इंग्लिश संघासाठी, बेन स्टोक्स हे एक संपूर्ण पॅकेज आहे, जो की सर्वच क्षेत्रांत इंग्लंडशी मदत करतो.

विश्वकरंडकात इंग्लंडचा नायक म्हणून नाव कमावलेल्या  स्टोक्सनेही टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या पाचमध्ये स्थान मिळविले आहे. स्टोक्सने टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 32 डाव खेळले असून 46 च्या सरासरीने 1334 धावा केल्या आहेत. स्टोक्सने यात 4 शतके आणि 6 अर्धशतकेही ठोकली आहेत. आजच्या काळात बेन स्टोक्स इंग्लंडच्या संघातील सर्वच फॉर्मेटमध्ये कणा असून तो एक उत्तम कामगिरी बजावत आहे.

चॅम्पियनशिप

अजिंक्य रहाणे

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या 5 फलंदाजांच्या यादीत टीम इंडियाचा अजिंक्य रहाणे हा एकमेव भारतीय खेळाडू आहे जो स्थान मिळवू शकला आहे. रहाणे ने या चॅम्पियनशिपमध्ये 17 सामन्यात 43.80 च्या सरासरीने 1095  धावा केल्या अाहेत. त्याने 3 शतक आणि 6 अर्धशतके ठोकली आहेत. अजिंक्य रहाणे टीम इंडियाच्या अनुभवी फलंदाजांपैकी एक असून त्याने आतापर्यंत कसोटीत 73 सामने खेळले आहेत. त्याने 41.3 च्या सरासरीने 4583 धावा केल्या आहेत. त्यात त्याने आतापर्यंत कसोटीत 13 शतके ठोकली आहेत. आयपीएलमध्ये तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत होता.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here