आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

कमी वयात लग्न आणि पुन्हा घटस्फोट झाला: मानली नाही हार; आता न्यूझीलंड पोलिसमध्ये झाली भरती


मूळच्या भारतीय असलेली मनदीप कौर ही आपल्या यशामुळे आजच्या तरुणीपुढे एक मिसाल बनली आहे. पंजाबमध्ये जन्मलेल्या मनदीपने आईवडिलांच्या मर्जीनुसार वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी लग्न केले. एक वर्षानंतर, पहिले मूल आणि नंतर दुसरे मुल झाले. पहिल्या मुलाच्या वेळी मनदीप महाविद्यालयाच्या अंतिम वर्षात शिकत होती.

पोलिस

संसारात काही दिवस सुखाचे चालत असताना अनेक अडथळ्यांना आणि संकटांना सुरूवात झाली. तिचे तिच्या नवऱ्याशी पटेनासे झाले. दोघांमध्ये सतत वाद व्हायचा. दोघांतला वाद कधी मिटला नाही. त्यांचा हा वाद विकोपाला गेला आणि दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर तिचा घटस्फोट झाला.

वैवाहिक आयुष्यात अडथळे आल्याने ती आपल्या मुलांसह पालकांच्या घरी आली. तिथून तिचा नवरा तिच्या मुलांना ताब्यात घेण्यावरून वाद झाला. शेवटी पतीने मुलाला आपल्या जवळ ठेवल्याने तिने आपल्या पालकांसमवेत मुलांना सोडून ऑस्ट्रेलियामध्ये गेली.

ऑस्ट्रेलियाला जाण्याचा मनदीपचा हेतू होता तीला स्वत: ला स्वावलंबी बनवायचे होते. जेणेकरून मुलांचे संगोपन चांगले होईल. मिळेल ते काम करून जीवन जगायचे आणि स्वावलंबी बनवायचं असा तिनं निर्धार केला. यासाठी नोकरीची शोधाशोध करू लागली.

पोलिस

ऑस्ट्रेलियात गेल्यानंतर तिला सेल्स वूमनची नोकरी मिळाली.  पण इंग्रजी नसल्यामुळे त्यांना बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागत असे. त्यानंतर ती मोठी स्वप्ने घेऊन न्यूझीलंडला गेली. जिथे ती ड्रायव्हिंग शिकली. टॅक्सी चालवताना ती महिलांच्या लॉजमध्ये राहत होती. जेथे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी नाईट रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होते. ज्यांना ती तिच्या वडिल  मानत असे. येथेच त्याला पोलीस अधिकारी होण्याचा मार्ग सापडला.

वडिलांसमान असणार्‍या त्या पोलीस अधिकाऱ्यांपासून  प्रेरणा घेत तिला पोलीस होण्याचे स्वप्न ती पाहू लागली. शरीराने ती धष्टपुष्ट असल्याने पोलीस होण्यासाठी तयारी करू लागली. कठोर परिश्रमानंतर त्यांची 2004 साली न्यूझीलंड पोलिसात निवड झाली. काळानुसार या कामात मनदीपने नवीन उंची गाठली.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here