आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

मेकअप न करताही सुंदर दिसणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीने कोट्यवधी रूपयांची जाहिरात करण्यास दिला नकार


 

अभिनेत्रीतुम्हाला माहिती आहे काय की, साई पल्लवीला कधीही अभिनेत्री व्हायचं नव्हतं. तिच्याकडे वैद्यकीय पदवी आहे.  साई जर अभिनेत्री झाली नसती तर ती कार्डिओलॉजिस्ट  झाली असती. 2014 मध्ये, ती शिकत असतानाच तिला ‘प्रेमाम’ चित्रपटातील ‘मलार’ च्या भूमिकेसाठी ऑफर मिळाली.  या चित्रपटात तिने लक्षवेधक भूमिका केली. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या या अभिनेत्रीने या चित्रपटासाठी साऊथचा फिल्मफेअर अवॉर्डही मिळविला.

अभिनेत्री

new google

यानंतर तिचा ‘काली’ हा मल्याळम चित्रपटही खूप गाजला होता आणि साई पल्लवीचा अभिनयही लोकांना खूप आवडला होता.  अभिनेत्री असण्याबरोबरच साई एक नर्तक देखील आहे. साईंने कधीही नृत्य प्रशिक्षण घेतले नाही. आतापर्यंत पल्लवीने केवळ 15 चित्रपटांत काम केले आहे आणि अशा अल्पावधीत तिने मोठे स्थान कमविले आहे. सुंदर दिसणार्‍या या अभिनेत्रीला   मुळातच डॉक्टर व्हायचे होते ती अपघाताने फिल्म इंडस्ट्रीमध्ये आली आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये अभिनयाच्या माध्यमातून कमी वेळात अधिक चाहते तयार केले आहे

अभिनेत्री

साई पल्लवी मेकअपशिवाय चित्रपटांमध्ये दिसली. यामुळे, ते सिनेप्रेमींमध्येही प्रचंड लोकप्रिय आहेत. साई तिच्या चित्रपटांमध्ये क्वचितच मेकप करते. साई पल्लवी सुपरस्टार ‘सिंघम’ची भूमिका करणार्‍या सूर्याबरोबर ‘एनजीके’ मध्ये दिसली आहे. सोशल मीडियावरुन आपण तिच्या लोकप्रियतेचे अनुमान काढू शकतो. तिच्या सौंदर्य अाणि ग्लॅमरस मुळे अनेक नवनवीन चित्रपटांच्या ऑफरदेखील सातत्याने येत असतात.

साईने 2 कोटी फेअरनेस क्रिमची जाहिरात करण्यास नकार दिला. गोरेपणा विषयीची ही जाहिरात होती. सौंदर्यप्रसाधनांविषयी तिने नापसंती दर्शविताना ती म्हणाली की, ती कधीही सुंदर दिसण्यासाठी मेकअप करत नाही आणि लोकांना गोंधळात टाकणार्‍या अशा जाहिराती ती करु इच्छित नाही. साईंच्या मते जे नैसर्गिक आहे ते अधिक चांगले आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

सुरेश रैनाची धडाकेबाज खेळी; कोहली-रोहित च्या ‘या’ विक्रमाची केली बरोबरी! 

शिष्याने गुरुला हरविले: आयपीएलमध्ये दबंग दिल्ली कॅपिटल्स पुढे चेन्नई सुपरकिंग्ज झाली चीत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here