आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

मॅचफिक्सिंगमुळे या खेळाडूचे करिअर बरबाद झाले: भारतीय संघात सलामीला करत होता फलंदाजी..


 

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू असलेला मनोज प्रभाकर 1980 आणि 1990 च्या दशकात प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याला माहित होता. पण या खेळाडूच्या आयुष्यात असे अनेक उतार-चढ़ाव होते की त्याला नावापेक्षा जास्त बदनामी मिळाली.  कधी सामना फिक्सिंगसाठी तर कधी फसवणूकीसाठीही अनेक ठिकाणी त्याचे नाव आले.

एकेकाळी भारतीय संघात सलामीला फलंदाजी करणारा या खेळाडूचे मॅच फिक्सिंगमुळे संपूर्ण करिअर बरबाद झाले. आज आपण प्रभाकरशी संबंधित काही रंजक किस्से पाहणार आहोत …

new google

मॅचफिक्सिंग

माजी भारतीय क्रिकेटपटू मनोज प्रभाकर अशा खेळाडूंपैकी एक आहे जो खेळापेक्षा अधिक वादासाठी प्रसिद्ध आहे. 12 वर्षाच्या क्रिकेट कारकीर्दीत प्रभाकरच्या आयुष्यात बरेच चढ-उतार गेले.

15 एप्रिल 1963 रोजी उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथे जन्मलेल्या मनोज प्रभाकरने दिल्लीकडून स्थानिक क्रिकेट खेळला. तो उजवा हाताचा मध्यम वेगवान गोलंदाज आणि एक उत्कृष्ट फलंदाज होता.

त्याने एप्रिल 1984 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये आणि डिसेंबर 1984 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.  1984  ते 1996  या काळात तो टीम इंडियाकडून क्रिकेट खेळले आणि भारतीय क्रिकेटमध्ये जबरदस्त योगदान दिले.

12 वर्षाच्या क्रिकेट कारकीर्दीत प्रभाकरने 130 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1858 धावा केल्या. 106 ही त्यांची सर्वाधिक धावसंख्या होती. त्याचबरोबर एकदिवसीय सामन्यातही त्याच्या नावावर 157 बळीची नोंद आहेत. याशिवाय 39 कसोटी सामन्यात त्याने 1600 धावा आणि त्याच्या नावावर 96 बळी नावावर अाहेत.

आपल्या क्रिकेट कारकीर्दीत तो बर्‍याचदा वादातही राहिला आहे. 1994 मध्ये भारताने त्यांच्या संथ फलंदाजीमुळे 4 धावांनी सामना गमावला.  तर भारताला विजयासाठी नऊ षटकांत 63 धावांची आवश्यकता होती.  पण प्रभाकर आणि मोंगिया दोघे मिळून 16 धावा करू शकले. यानंतर त्याला काही काळ त्याला संघातून वगळण्यात आले.

 

मॅचफिक्सिंग

सामना फिक्सिंगमुळे त्यांच्यावर आजीवन बंदी घातली होती. 1999 मध्ये तो मॅच फिक्सिंगच्या एका स्टिंग ऑपरेशनमध्ये सामील झाला होते. अनेक बड्या भारतीय क्रिकेटर्सवर त्याने मॅच फिक्सिंगचा आरोप केला.

पण तो त्यातच अडकला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मॅच फिक्सिंगमध्ये त्याला दोषी ठरविण्यात आले. त्यानंतर 2000 साली त्याच्यावर बीसीसीआयने बंदी घातली होती. सुमारे सहा वर्षानंतर त्याच्यावरील बंदी काढून घेण्यात आली.

मनोज प्रभाकरने छुप्या पद्धतीने बॉलिवूड अभिनेत्री फरहीनशी लग्न केले. गेल्या वर्षी त्याच्याविरूद्ध अाणि त्यांची पत्नी फराहीन यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्या पहिल्या पत्नीने असा आरोप केला होता की, फराहने फ्लॅट परत करण्यासाठी 1.50 कोटींची मागणी केली होती.

ते म्हणाले होते की, मनोज प्रभाकर यांच्या गुंडांनी फ्लॅटचे कुलूप तोडून ताब्यात घेतला. आरोपानंतर अनेक वर्षे त्यांनी दिल्ली रणजी संघ आणि राजस्थान संघाला प्रशिक्षणही दिले.  2016 टी -20 विश्वचषकापूर्वी ते अफगाणिस्तानचा गोलंदाजी प्रशिक्षकही होते.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here