आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

90 च्या दशकात क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या या खेळाडूंनी घेतली नाही निवृत्ती; एक आहे भारतीय खेळाडू ..


 

क्रिकेट इतिहासामध्ये फारच कमी खेळाडू आहेत ज्यांना आपल्या देशासाठी बराच काळ खेळण्याची संधी मिळते. बर्‍याच क्रिकेटमध्ये त्यांच्या देशासाठी 5 ते 6 वर्षे खेळणे देखील अवघड आहे. जर एखाद्या क्रिकेटपटूने आपल्या देशासाठी 10 वर्षांहून अधिक कालावधीचा खेळ खेळला तर तो एक महान क्रिकेटपटू मानला जातो.

 

new google

आज आम्ही तुम्हाला क्रिकेटच्या इतिहासातील अशा तीन खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी 90 च्या दशकात आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते, परंतु त्यांनी अद्याप निवृत्तीची घोषणा केलेली नाही.

ख्रिस गेल

युनिव्हर्सल बॉस म्हणून ओळखल्या जाणार्‍या ख्रिस गेलने 1999 मध्ये टोरोंटो मैदानात भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पण सामन्यात नंबर 4 वर फलंदाजी करताना तो केवळ 1 धावांवर बाद झाला. त्याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली नाही. भारतात होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषकापर्यंत खेळणार असल्याचे संकेत यापूर्वी त्याने  दिले होते.

 खेळाडू

ख्रिस गेलच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर एक नजर टाकली असता त्याने  301 एकदिवसीय सामन्यात 37.83 च्या सरासरीने 10 हजार 480 धावा केल्या आहेत. यात 25 शतके आणि 54 अर्धशतकांचा समावेश आहे. 103 कसोटी सामन्यांत 42.19 च्या सरासरीने 7 हजार 215 धावा केल्या आहेत. यात 15 शतके आणि 37 अर्धशतकांचा समावेश आहे.

ख्रिस गेलला सिक्सर किंग म्हणतात. तो  लांब षटकार मारण्यासाठी ओळखला जातो. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 98 षटकार ठोकले आहेत. त्याचवेळी वनडे क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत 331 षटकार ठोकले आहेत. त्याने खेळलेल्या 58 टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 105 षटकार ठोकले आहेत.

 तो आयपीएलमध्येही सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज आहे.

आयपीएलमध्ये खेळलेल्या त्याच्या 125 सामन्यात त्याने एकूण 326 षटकार लगावले आहेत. आयपीएलमध्ये 300 पेक्षा जास्त षटकार मारणारा तो एकमेव फलंदाज आहे.

हरभजन सिंग

भारताचा फिरकीपटू टर्बनेटर हरभजन सिंगने 17 एप्रिल 1998 रोजी न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याचबरोबर त्याने 25 मे 1998 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले. हरभजन सिंगने भारतीय संघासाठी आतापर्यंत 103 कसोटी सामने, 236 एकदिवसीय आणि 28 टी -20 सामने खेळले आहेत. त्याने आतापर्यंत कसोटी कारकीर्दीत 417 बळी, एकदिवसीय कारकीर्दीत 269 बळी आणि टी -20 क्रिकेट कारकीर्दीत 25 बळी घेतले आहेत.

खेळाडू

हरभजन सिंग बर्‍याच दिवसांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. हरभजनने 2016 मध्ये त्याने भारतीय संघासाठी शेवटचा सामना खेळला होता, जो यूएईसारख्या कमकुवत संघाविरुद्ध होता. त्याने शेवटचा कसोटी सामना 2015 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता.  त्याचवेळी, हरभजन सिंगने 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध मुंबई येथे अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. जरी तो संघातून बाहेर पडत आहे, परंतु अद्याप त्याने निवृत्तीची घोषणा केलेली नाही.

हरभजनला गेल्या पाच वर्षांपासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळता आला नसला तरी तो आयपीएलमध्ये विविध फ्रेंचायझीकडून खेळत आहे. यंदा तो कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाकडून खेळत होता. मात्र त्याला या आयपीएलमध्ये फारशी संधी मिळाली नाही.

शोएब मलिक

पाकिस्तानच्या शोएब मलिकनेही 90 च्या दशकात पदार्पण केले होते.  त्याने 14 ऑक्टोबर 1999 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पदार्पण सामन्यात त्याने फलंदाजी केली नाही, परंतु चेंडूच्या मदतीने त्याने 8 षटकांत केवळ 34 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्या.

खेळाडू

शोएब मलिकने पाकिस्तान संघासाठी एकूण 287 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 34.55 च्या सरासरीने 7534 धावा केल्या आहेत.  त्याने वनडे कारकीर्दीत 9 शतके आणि 44 अर्धशतके झळकावली आहेत.  त्याने 35 कसोटी सामन्यांमध्येही 1898 धावा केल्या आहेत.

त्याने पाकिस्तानकडून 111 टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 30.58 च्या सरासरीने 2263 धावा केल्या आहेत.  त्याने एकदिवसीय आणि कसोटीतून निवृत्तीची घोषणा केली आहे, परंतु आतापर्यंत टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली नाही. भारतात होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषकानंतर तो निवृत्त होण्याची शक्यता आहे.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

तुम्हाला हे सुद्धा वाचायला आवडेल. = अस्सल  हापूस आंबा कसा ओळखायचा?

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here