आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

तंबाखूमुक्त समाज घडविण्यासाठी ही तरूणी करतेय धडपड; समुपदेशनाद्वारे तरुणाईमध्ये करतेय जनजागृती..


 

देशात तंबाखूचे सेवन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. युवापिढी व्यसनात अखंड बुडाली आहे. तसे पाहता कोणतेही व्यसन वाईटच. कारण एकदा ते व्यसन जडले की, सुटायला प्रचंड प्रयत्न करावे लागतात. व्यसनाधीनतेत मश्गुल असलेल्या तरुणाईला बाहेर काढण्यासाठी एक तरुणी व्यसनाधीनता विरोधी लढा देत आहे.

तंबाखू

new google

शाळा आणि महाविद्यालयात जाऊन तरूणाईचं समुपदेशन करण्याचे काम करत आहे. कावेरी बिज्जरगी असे या तरुणीचे नाव आहे.

सोलापूर जिल्ह्यातल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग या गावची रहिवाशी असलेल्या कावेरीला महाविद्यालयीन जीवनापासूनच सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड. महाविद्यालयात असताना एनएसएस आणि एनसीसीच्या माध्यमातून ती विविध उपक्रमात सहभागी घेऊ लागली.

पुढे एमएसडब्ल्यू चे शिक्षण घेत असताना समाजाचा जवळून संबंध आला. समाजातल्या विविध समस्यांचा अभ्यास करत असताना तिला सध्याची युवा पिढी तंबाखूच्या व्यसनात अडकल्याचे दिसले. आपल्या उमेदीच्या काळात तिने ही पिढी व्यसनमुक्त करण्याचा संकल्प केला.

तंबाखूचे व्यसन हे घातक असल्याने तरीही त्याचे सेवन केले जाते. यामुळे कित्येकांचे आयुष्य संपले. समाज व्यसनमुक्त व्हावा, यासाठी तंबाखूविरोधी मोहिमेत काम करण्याचं निश्चय तिने केला. दरम्यान, कावेरील‍ सारथी युथ फाऊंडेशनच्या फेलोशिपची माहिती मिळाली.

तंबाखू

तंबाखू व्यसनमुक्ती विषयावर सामाजिक कार्य करु इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी ही फिलोशिप दिली जाते. फेलोशिपमध्ये सहभागी होऊन या सामाजिक संस्थेसोबत ती काम करू लागली. पुढे शाळा आणि महाविद्यालयीन पातळीवर ती विविध उपक्रम राबवू लागली. तरुणाईमध्ये तंबाखूविरोधी प्रबोधन होण्यासाठी व्याख्याने व आरोग्य शिबिरे राबवू लागली.

कावेरी प्रबोधन कार्यक्रमात व्यसनी लोकांच्या आयुष्यात आलेल्या त्या भयाण दिवसांतील अनुभवांचे कथन करते. यासह  युवापिढीला ती तंबाखू सोडण्याची शपथ देते. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ तसेच व्यसनांपासून होणाऱ्या शारीरिक व मानसिक रोगांविषयी उपस्थितांचे समुपदेशन करताना तंबाखूचे व्यसन सोडण्याचे आवाहन करते.

तंबाखू व्यसनमुक्त होऊ इच्छिणाऱ्यांना सारथीच्या तंबाखू व्यसनमुक्ती अनामिक स्व मदत गट बैठक (टि ए मिटिंग)मध्ये सहभागी करून घेते. कोव्हिड १९ च्या प्रादुर्भावामुळे तिचा लोकांशी प्रत्यक्ष संपर्क येत नसला तरी ती ऑनलाईनच्या माध्यामातून युवापिढीचे समुपदेशन करत आहे.

शाळा आणि महाविद्यालयीन स्तरातून संस्कार

सारथी युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून  शालेय स्तरावर तंबाखू विरोधी वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा इत्यादी आयोजित करून कावेरी प्रबोधन करत असते. व्यसनाधीनतेत कुणीही अडकू नये किंवा त्यातून ते लोक बाहेर कसे येतील यासाठी तिची धडपड सुरु असते. अशाप्रकारे शालेय आणि महाविद्यलयीन स्तरातून संस्कार केले गेल्याने निरोगी, सदृढ, व्यसनमुक्त आणि बलशाली नागरिक घडल्यास नक्कीच मदत होणार आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

तुम्हाला हे सुद्धा वाचायला आवडेल. = अस्सल  हापूस आंबा कसा ओळखायचा?

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here