आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

स्वत: च्या पॉकेटमनीतून कॉलेज तरुणी भागवते बेघरांची भूक  कोरोनाकाळात तरूणाई जपते सामाजिक भान


 

हल्लीची तरुणाई अभ्यासाकडे दुर्लक्ष करून सोशल मीडियासारख्या आभासी विश्वात जास्त रमते, अशी ओरड पालक करत असतात. मात्र दुसरीकडे कोरोनासारख्या महामारीत हीच युवापिढी सामाजिक भान जपत बेघर आणि निराधार लोकांना मदतीचा हात देत माणुसकीचे दर्शन घडवत आहे. सोलापूर शहरातील एक युवती आपल्या पॉकेट मनीमधून   भुकेने व्याकूळ झालेल्या लोकांना अन्नदान करुन त्यांची भूक भागवत आहे. ज्योती यमाजी असे या तरुणीचे नाव आहे.

तरुणी

new google

 

आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत आपले सामाजिक जबाबदारी पार पाडणारी ज्योती हे शहरातील सत्तर फूट रोड येथील विजयनगर या परिसरात राहते. २२ वर्षीय ज्योती ही गेल्या लॉकडाऊनपासून कोरोनाची तमा न बाळगता अन्नदान करण्याचे काम करत आहे. त्यामुळे भुकेने व्याकूळ झालेल्या गरिबांना तात्काळ मदत मिळाल्याने त्यांची उपासमार टाळत आहे. अन्नदान करण्यासाठी ती कुणाकडूनही आर्थिक मदत घेत नाही. आपले शिक्षण घेत ती श्री हेल्थ फिटनेस क्लब या येथे फिटनेस ट्रेनर म्हणून काम करत आहे.

आपल्या कमाईतून मिळालेला काही हिस्सा ते सामाजिक कार्यावर खर्च करते. सध्या कोरोना काळात जिम बंद असल्याने ती ऑनलाईन च्या माध्यमातून होम पी.टी.चे क्लास घेते. सामाजिक कार्याची आवड आणि प्रेरणा तिच्या आईमुळे निर्माण झाली. भुकेने तडफडू नये यासाठी तिने अन्नदानाचे कार्य हाती घेतले आहे. ज्योती आईच्या पोटात असतानाच वडिलांचे छत्र हरपले. तिची आई महानंदा ही एक खाजगी पिठाच्या गिरणीत काम करुन अापले घर चालविते. आईच्या पदराखाली मोठी होत तिने आपले शिक्षण पूर्ण केले.

तरुणी

शिक्षणघेत ती समाज कार्यातही आपले भरीव योगदान देणारी ज्योती जिद्दी आणि अभ्यासू अाहे. गेल्या तीन वर्षांपासून ती स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पोलीस भरती होण्याचे स्वप्न तिने उराशी बाळगले आहे. शिक्षण, घरची जबाबदारी आणि काम यांच्यातून मिळालेल्या फावल्या वेळेत ती सामाजिक कार्य करते. स्वत:च्या गाडीवर शहरात फिरून रस्त्याच्या कडेला राहून अर्धपोटी जीवन जगणार्‍या बेघर लोकांचा शोध घेऊन त्यांना चहा बिस्किटे, फूड पॅकेट्स पाणी बॉटल स्वखर्चातून पुरवते. तिच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अव्वल क्रमांकाची धावपटू 

गरिबांविषयी विशेष आस्था असलेली ज्योती समाजकार्य बरोबर खेळातही अग्रेसर आहे. एक उत्तम प्रकारची युवा धावपटू आहे. सोलापूर रनर्स असोसिएशन आयोजित २१ किलोमीटर हाफ मॅरेथॉनमध्ये तिने तीनवेळा बक्षिसे मिळविली आहेत. भविष्यात तिला राज्यपातळीवरील विविध स्पर्धांमध्ये तिला भाग घ्यायचा असल्याने ती मैदानात फिटनेससाठी प्रचंड मेहनत घेत असते.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

तुम्हाला हे सुद्धा वाचायला आवडेल. = अस्सल  हापूस आंबा कसा ओळखायचा?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here