आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

‘या’ तीन दिग्गज भारतीय खेळाडूंना महेंद्रसिंग धोनीमुळे घ्यावी लागली क्रिकेटमधून निवृत्ती?


 

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सर्वोत्तम कर्णधार ठरला आहे. तो भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. तथापि, भारतीय क्रिकेटला नवीन उंचीवर नेण्यात एम एस धोनीने मोठे योगदान दिले.  ज्यांचे कर्णधारपद संपूर्ण क्रिकेट जगात झळकले.

 

धोनी गेल्या 15 वर्षापासून भारताकडून खेळत आहे आणि यावेळी त्याने सुमारे दहा वर्षे संघाचे नेतृत्व केले. संघाच्या कर्णधारपदाच्या काळात भारताने बरीच मोठी पदके जिंकली, त्याचवेळी अनेक युवा क्रिकेटपटूंनाही विशेष संधी मिळाली. धोनीच्या नेतृत्वात भारताच्या अनेक युवा क्रिकेटपटूंना क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. यात काही शंका नाही, परंतु त्याच वेळी हे नाकारता येणार नाही की धोनीमुळे भारतातील काही बड्या खेळाडूंनाही निवृत्तीचा निर्णय घ्यावा लागला, जे की अजून काही वर्षे खेळले असते. आम्ही आज तुम्हाला त्या खेळाडूंची नावे सांगणार आहोत जे धोनीमुळे लवकरच सेवानिवृत्त झालेत.

 

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून ओळखला जायचा. लक्ष्मणने बर्‍याच वर्षांपासून खेळणार्‍या भारतीय क्रिकेटमध्ये उत्कृष्ट योगदान दिले आहे. त्याने कसोटी क्रिकेटच्या मधल्या फळीत जबरदस्त भूमिका केली. तो एक जबरदस्त फलंदाज होता यात शंका नाही. परंतु त्याची कारकीर्द निराशाजनक मार्गाने संपली. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात काही वर्षे खेळल्यानंतर त्याला 2012 मध्ये अचानक संघातून वगळण्यात आले आणि त्यानंतर व्हीव्हीएस लक्ष्मणने निवृत्तीची घोषणा केली.

महेंद्रसिंग धोनी

जेव्हा जेव्हा भारतीय क्रिकेट इतिहासातील महान फलंदाजांबद्दल चर्चा केली जाईल तेव्हा राहुल द्रविडचे नाव घेतले जाईल. भलेही त्याला सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीसारखा सन्मान मिळालेला नाही, परंतु राहुल द्रविडने ज्या प्रकारे भारतीय क्रिकेट संघात वर्षानुवर्षे योगदान दिले आहे, ते कधीही विसरता येणार नाही.

 

भारतासाठी एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमधील फलंदाजीचा मुख्य आधार म्हणून राहुल द्रविड मानला जातो. त्याच्या कारकिर्दीचा शेवटदेखील अपेक्षेप्रमाणे झाला नव्हता. राहुल द्रविडलाही हळू हळू महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात बाजूला सारण्यात आले होते. त्यानंतर द्रविडने अचानक 2011 मध्ये आपल्या कारकीर्दीला निरोप देण्याचे ठरवले.

महेंद्रसिंग धोनी

सलामीवीर वीरेंद्र सेहवाग भारतीय क्रिकेट संघात किती मोठा होता हे सांगण्याची गरज नाही. त्याने तिन्ही फॉर्मेटमध्ये भारतीय क्रिकेटची सलामीची जबाबदारी बराच काळ निभावली आणि अभूतपूर्व कामगिरी केली. तो हा भारताचा सर्वात यशस्वी सलामीवीर मानला जातो.

 

तो हा भारतासाठी खूप मोठा फलंदाज होता परंतु त्याला मिळालेला निरोप खूपच वाईट होता. 2011 च्या महेंद्रसिंग धोनीने सेहवागला फारसे महत्त्व गेले नाही. 2013 मध्ये सेहवागला शेवटच्या वेळेस खेळण्याची कशीबशी संधी मिळाली, त्यानंतर त्याला वगळण्यात आले. बरीच प्रतीक्षा केल्यानंतर, वीरूने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने 2015 मध्ये निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here