आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

सीएची परीक्षा सोडून प्लाझ्मा दानाविषयी तरुणी करतेय जन’जागृती’

जनकल्याण समितीच्या ‘समर्थ भारत’ उपक्रमाद्वारे रुग्णांना मदत


 

 

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी आपल्या शरीरात कोरोना विरुद्ध लढण्यासाठी तयार झालेली प्रतिपिंडे इतर गरजू रुग्णांना मिळावेत यासाठी रक्तद्रव अर्थात प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन वेळोवेळी करूनही त्याला  प्रतिसाद मिळाला नाही. प्लाझ्मा डोनेटमुळे कोणत्यातरी कोरोनाग्रस्त रुग्णांचा जीव वाचेल या भावनेतून एक तरुणी प्लाझ्मा डोनेटविषयी जनजागृती करत आहे. जागृती अयाचित असं या तरूणीचं नाव आहे. यासाठी तिने आपली सीएची परीक्षा नंतर देण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.

new google

प्लाझ्मा

२८ वर्षीय जागृती अयाचित पुण्यातील सहकारनगर पर्वती परिसरात राहते. एम.कॉम.चे शिक्षण घेतलेल्या जागृतीने गेल्या वर्षभरापासून प्लाझ्मा डोनेट विषयी जनजागृती करून कोरोनाग्रस्त रुग्णांची मदत करत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन कल्याण समितीच्या माध्यमातून ‘समर्थ भारत’ हा उपक्रम राबवण्यात येतोय. या उपक्रमाअंतर्गत एक वॉर रूम स्थापन करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिका अंतर्गत एकूण नऊ विभाग तयार करण्यात आले. यातील एका विभागाचे प्रमुख म्हणून जागृती काम पाहत आहे.

 

सीएच्या अंतिम वर्गात शिकणारी जागृती प्लाझ्मादान आणि संकलनाची जबाबदारी सांभाळते. जागृतीसह त्यांच्या या टीममध्ये जवळपास १४५ सदस्य काम करत आहेत. या उपक्रमाअंतर्गत कोरोना ग्रस्तरुग्णांचा डाटा गोळा करण्यात येतो. यातील प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी पात्र लोकांशी संपर्क साधून प्लाझ्मा डोनेट करण्याविषयी त्यांचे समुपदेशन केले जाते. डोनेट केलेला प्लाझ्मा गरजू व्यक्तींपर्यंत हॉस्पिटलमार्फत पोहोचवण्याचे काम ते करतात. गेल्या एक वर्षांपासून हे काम नित्यक्रमाने सुरू आहे. यासाठी आपल्या भविष्याचा विचार न करता शिक्षण बाजूला ठेवून ती झटत आहे.

प्लाझ्मा

जागृती सांगते, प्लाझ्मा डोनेटसंदर्भात दात्याला स्वत: फोनवरून संपर्क साधतो. प्लाझ्मा डोनेट करण्याविषयी त्यांचे समुपदेशन करतो. वॉररूमकडे दिवसभरात ३०० हून अधिक रुग्णांच्या नातेवाईकांचा प्लाझ्मा मागणी संदर्भात फोन येतात. पण सर्वच लोकांना प्लाझ्मा मिळणे शक्य होत नाही. गेल्या वर्षभरात एकूण दीड हजारहून अधिक लोकांना प्लाझ्मा देण्यात आला आहे. यामुळे अनेक रूग्णांची मदत झाली आहे. यासह रुग्णांना ऑक्सिजन बेड कुठे उपलब्ध आहेत तसेच सरकारी गाईडलाईनची माहिती वॉररूमच्या माध्यमातून दिली जाते.

परीक्षेच्या दिवशीच प्लाझ्मा दात्याचा घेत होती शोध .

गेल्या वर्षी मी सीएची परीक्षा देणार होते. पण ज्या दिवशी दुपारी दीड वाजता सीएचा पेपर होता. त्याच दिवशी मी बारा-एक वाजेपर्यंत प्लाझ्मा दात्यांचा शोध घेत फिरत होते. अनेकांना संघ माध्यमातून प्लाझ्मा उपलब्ध झाल्याने फोन नंबर बऱ्याच ठिकाणी पोहोचला होता. परीक्षेच्या दिवशीही सतत फोन येत असल्याने रुग्णांची गरज लक्षात घेऊन पुढील परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. ही परीक्षा कधी द्यायची याचा अद्याप विचार केला नाही.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here