आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

तब्ब्ल 5वेळा प्रेमात पडलेल्या कंगनाला नशिबाने नेहमीच धोका दिलाय..


 

बॉलिवूड क्वीन कंगना रानावत आपल्या बेधडक अंदाजाने नेहमीच इंडस्ट्रीमध्ये चर्चेत असते. प्रत्येक मुद्यावर आपली बाजू मांडण्याचा तिला खूप छंद आहे. मग मुद्दा बॉलिवूडमधील असो अथवा राजकारणाचा त्यावर कंगना आपले मत मांडणार हे जवळपास ठरलेलंच असायच.

सध्याच्या घडीला कंगना तिच्या बेधडक स्वभावणे बॉलिवूडमध्ये चर्चत जरूर असते.परंतु याआधी कंगना चर्चेत होती तें तिच्या प्रेमामुळे.

new google

कंगना

असं म्हणतात कंगनाला आतापर्यंत एक नाही तरंतब्बल 5 व्यक्तीवर खरं प्रेम झालं होत.परंतु प्रत्येक वेळी तिच्या नशिबाने तिला साथ दिली नाही. अनेक जणांनी तिला यात धोका दिला.

चला जाणून घेऊया कोन आहेत तें 5 लोक ज्यांना कंगनाने आपलं हृदय दिले होते.

आदित्य पंचोली.

असं म्हटलं जात की कंगना रानावतला बॉलिवूडमध्ये आणण्यात सर्वांत जास्त आदित्य पांचोली चा हात होता.तिचा बॉलिवूड मध्ये डेब्यु सुद्धा आदित्यनेच केला होता. 2004मध्ये आदित्यची ओळख कंगना सोबत झाली. त्यावेळी कंगना बॉलिवूडमध्येआपली ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात होती. अश्या वेळी आदित्यने तिला मदत केली आणि कंगनाचा पहिला चिटपट गँगस्टर रिलीज झाला.

 

यानंतर कंगना एक एक करत बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर यशाच्या पायऱ्या चढत गेली. स्ट्रगलिंग काळात सुरु झालेलं आदित्य आणि कंगनाचे संबंध कंगना यशाच्या वाटेवर जाताच कमी कमी होत गेले. याचं कारणामुळे आदित्य आणि कंगनामध्ये पोकळी निर्माण झाली. आणि त्यांचे नाते तुटले.

अध्ययन सुमन

आदित्य पांचोलीसोबत ब्रेकअप केल्यानंतर कंगनाच हृदय शेखर सुमनचा मुलगा अध्ययन सुमन वर आले. 2009 मध्ये या दोघांच्या प्रेमाच्या चर्चा वर्तमान पत्रकात छापून यायला लागल्या होत्या. दोघानीही राज सिरीजच्या एका चित्रपटात सोबत कामं केले होते. परंतु त्यानंतर यांच्या सुद्धा आयुष्यात अंतर्गत वाद निर्माण होऊन नंतर दोघेही वेगळे झाले.

 

अजय देवगण

कंगना

‘वन्स अपोन ए टाइम इन मुंबई’ चित्रपटात कंगनाने बॉलीवूडचा सिंघम अजय देवगण सोबत कामं केले. दोघांच्या जोडीने मोठ्या पडद्यावर धूम माजवली होती. अजय आणी कंगना जेवढ्या लवकर एकमेकांच्या जवळ आले तेवढ्याच लवकर तें वेगळेही झाले. या दोघांच्या नात्याबद्दल बोलताना कंगनाने एका इंटरव्हिवू मध्ये सांगितले होते की लग्न झालेल्या अभिनेत्याला डेट करणे ही माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी चूक होती. तिच्या या वाक्याला अजय देवगणने ही आपल्या बाजूने उत्तर दिले होते.

 

निकोलस लेफर्टी

कंगना

निकोलस लेफ्टी एक विदेशी डॉकटर आहे. यांच्या सोबत कंगनाचे नाव तेव्हा जोडण्यात आले जेव्हा हे दोघे मुंबईतील एका कार्यक्रमात सोबत आले होते. यांच्या रिलेशनशिपला बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांत छोट रिलेशन म्हटलं जाते. कमी काळातच हे दोघे पुन्हा आपल्या मार्गांवर परतले होते.

रितिक रोशन

 

 

कंगना रानावत आणि हृतिक रोशन यांच्या प्रेमसंबंधाच्या चर्चा सर्वांत जास्त झाल्या. आपल्या रिलेशनमध्ये यांनी प्रेम कमी आणि एकमेकांवर आरोप जास्त केले होते. दोन्हीही गोष्टीमध्ये ही जोडी कायम चर्चेत राहिली. दोघांनी आपल्या या रिलेशनमध्ये एकमेकांवर एवढे गंभीर आरोप लावले होते की मामला कोर्टापर्यंत पोहचला होता..

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

सुरेश रैनाची धडाकेबाज खेळी; कोहली-रोहित च्या ‘या’ विक्रमाची केली बरोबरी! 

शिष्याने गुरुला हरविले: आयपीएलमध्ये दबंग दिल्ली कॅपिटल्स पुढे चेन्नई सुपरकिंग्ज झाली चीत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here