आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

राजकपूर आणि नर्गिसच्या प्रेमाच्या चर्चा गावातील म्हातारी मंडळी वट्यावर बसून करायचे…!


 

चित्रपटाच्या जगामध्ये अनेक अश्या गाजलेल्या प्रेम कहाण्या आहेत ज्या लोकांना माहिती तरं आहेत परंतु त्यांच्या प्रेम कहानीच पुढे काय झालं याबद्दल ना त्यांना काही कळले ना त्यांनी तें जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

अश्याच प्रेम कहाण्यापैकी एक म्हणजे अभिनेता राज कपूर आणि अभिनेत्री नर्गिस यांची प्रेम कहाणी.त्या काळात नर्गिस आणि राज कपूर यांच्या प्रेमाच्या चर्चा गावातील म्हातारी मंडळी वट्यावर बसून करायचे.

new google

नर्गिस

नर्गिस त्या काळची इंडस्ट्रीमधील सर्वांत सुंदर अभिनेत्री होती. नर्गिस आणि राजकुमार यांची पहिली भेट 1946मध्ये झाली होती.नर्गिसला पाहताच राज कपूर तिचे दिवाने झाले होते.

पहिल्याच भेटीला नर्गिसवर प्रेम झालेले राज कपूर तिच्यासोबत कामं करण्यास उत्सुक झाले होते. कारण होते की राजकपूर नर्गिसला चित्रपटात कामं देण्यास स्क्रिप्ट रायटर इंदर कुमार यांच्या भेटीस पोहचले होते. त्यांनी इंदर कुमार यांना विनंती केली होती की काहीही करून या चित्रपटात नर्गिसला छोटा मोठा रोल देऊन जोडा,कारण मला तिच्यासोबत कामं करायचं आहे. याचं चित्रपटाच्या सेटवरून कामं करत करत नर्गिस आणि राज कपूर यांचं सूत जुळलं होत.

 

या दोघांच्या प्रेम कहाणीत सर्वांत मोठा अडथळा हा होता की,जेव्हा नर्गिस राज कपूरच्या आयुष्यात आली त्यावेळी राज कपूर यांचे अगोदरच एक लग्न झालेलं होत. असं असताना सुद्धा राज कपूरने समाजाची परवा न करता आपले प्रेमसंबंध सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला. याचं काळात दोघांनी सोबत मिळून असे अनेक चित्रपट रिलीज केले.

नर्गिस
नर्गिस

1950 मध्ये बरसात, 1951मध्ये आवरा यासारख्या हिट चित्रपटात दोघे सोबत दिसून आले होते. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते.

कपूर परिवारावर आधारीत मधू जैनने लिहलेल्या आपल्या पुस्तकात म्हटले आहे की,त्यावेळी नर्गिस राजकुमारच्या प्रेमात एवढी पागल झाली होती की, तिने आपलं प्रेम दाखवण्यासाठी आपलं हृदय, दागिने आपले पैसे एवढचं नाहीं तरं आपल घर सुद्धा विकून राजकुमारच्या चित्रपटास पैसे लावायला सुरवात केली होती.

जेव्हा आर.के स्टुडिओ जवळ पैस्याची कमतरता भासत होती तेव्हा तिने आपल्या हातातील सोन्याचे काखन सुद्धा विकले होते.

ज्या चित्रपटासाठी तिने आपले सोन्याचे काखण मोडले तो चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात गाजला. यादरम्यान राज कपूरने नर्गिससंबंधी एक मोठा निर्णय घेतला.

त्यांनी सर्वाना सांगून टाकले की आता नर्गिस फक्त आर.के. स्टुडिओ सोबतच काम करणार. राज कपूरच्या प्रेमात पागल झालेल्या नर्गिसनेही त्यांची ही गोष्ट मान्य केली आणि बॉलीवूडच्या अनेक मोठ्या निर्मत्यांची ऑफर नाकारली.

नर्गिस

नर्गिस आणि राज कपूर यांच्या नात्याचा हा चांगला काळ फार जास्त टिकू शकला नाही. काही काळानंतर नर्गिसची इच्छा होती की राज कपूरने आता तिच्यासोबत विवाह करून घर बसवावे. परंतु या दरम्यानच तिला कळले की,राज कपूर आपली पहिली पत्नी कृष्णाला घटस्फोट देऊन तिला आपल्या जीवनातून काढुन टाकण्यास उत्सुक नाहीत. तिला हे कळून चुकले होते की राज कपूर तिच्यासोबत राहण्यास सुद्धा उत्सुक नाहीत.

 

त्यानंतर नर्गिसने राज कपूर पासून लांब राहण्यास सुरवात केली. राज कपूरने सांगितलेला आर.के. स्टुडिओ सोडून कोणत्याही निर्मात्यासोबत कामं न करण्याचा सल्ला सुद्धा नर्गिसने तेव्हा मोडला आणि इतर निर्मात्यासोबत चित्रपट करण्यास सुरवात केली.

त्यावेळी नर्गिसची ओळख झाली ती सुनील दत्त यांच्यासोबत चित्रपट मदर इंडियाच्या सेटवर. या चित्रपटाच्या सोबतच नर्गिस आपल्या आयुष्यात समोर चालत गेली. राज कपूर कडून प्रेमभंग झालेल्या नर्गिसला सुनील दत्तने सहारा दिला.

1958 मध्ये नर्गिस आणि सुनील दत्त यांनी लग्न केले आणि त्यानंतर कधीही नर्गिसने राज कपूर यांच्याकडे ढुंकूनही पहिले नाही.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

कंगनाचे जेवढे स्टेटमेंट व्हायरल असतात तेवढ्याच तिच्या प्रेम कहाण्याही मसालेदार आहेत…!

सुरेश रैनाची धडाकेबाज खेळी; कोहली-रोहित च्या ‘या’ विक्रमाची केली बरोबरी! 

शिष्याने गुरुला हरविले: आयपीएलमध्ये दबंग दिल्ली कॅपिटल्स पुढे चेन्नई सुपरकिंग्ज झाली चीत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here