आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|

===

खूपच रोमांचकारी आहे रॉबिन उथप्पाची लव्हस्टोरी; जाणून घ्या त्याला दोनवेळा लग्न का करावे लागले?


 

भारतीय क्रिकेट संघाने 2007 साली दक्षिण आफ्रिकेत खेळलेला आयसीसी टी -20 वर्ल्ड कप जिंकला. पहिला टी -20 विश्वचषक जिंकणार्‍या महेंद्रसिंग धोनीच्या संघात त्याच संघात एक तरुण खेळाडू होता, जो अत्यंत धोकादायक फलंदाज मानला जात होता पण आज तो भारतीय संघातून बाहेर पडला आहे. तो खेळाडू म्हणजेच सध्या भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या प्रतीक्षेत असलेला रॉबिन उथप्पा.

 

रॉबिन उथप्पा

रॉबिन उथप्पाने 2006 मध्ये आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला सुरुवात केली आणि पहिल्याच सामन्यात एक आश्चर्यकारक खेळी केली होती.

यानंतर उथप्पाला 2007 मध्ये दोन्ही विश्वचषक खेळण्याची संधी मिळाली. रॉबिन उथप्पा काही वर्षांपासून भारतीय संघात मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळत आहेत पण त्यानंतर तो जो टीम इंडियाच्या बाहेर गेलाय तो आजूनही संघात पुनरागमन करू शकला नाहीये.

रॉबिन उथप्पा

रॉबिन उथप्पा भारतीय संघात परत येऊ शकेल की नाही या सर्व गोष्टी भविष्यातील गोष्टी आहेत. पण आज आम्ही तुम्हाला त्याच्या क्रिकेटशिवाय त्याच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगणार आहोत जी एखाद्या चित्रपटाच्या स्टोरीपेक्षा कमी नाहीये. रॉबिन उथप्पाने माजी भारतीय टेनिसपटू शीतल गौतमशी लग्न केले आहे. उथप्पाचे शीतल गौतमशी दीर्घकाळ प्रेमसंबंध होते आणि वेगवेगळ्या धर्मांमुळे वैवाहिक जीवनात अनेक अडथळे निर्माण झाले होते शेवटी 8 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर या जोडप्यास लग्नास परवानगी देण्यात आली.

रॉबिन उथप्पा

रॉबिन उथप्पा याची टेनिसपटू शीतल गौतम याच्याशी 2009 मध्ये प्रथमच भेट झाली. शीतल हिंदू आणि रॉबिन ख्रिश्चन पण त्यांना एका मित्राने भेट करुन दिली. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. रॉबिन उथप्पाने प्रेम उघडणपणे दाखविले नव्हते. आणि दोघांनीही एकमेकांना डेट केले, अखेर 2014 मध्ये दोघांचे संबंध जगासमोर आला तेव्हा एक क्षण आला. त्यानंतर रॉबिन उथप्पाने शीतलच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

दोघांना एकमेकांशी लग्न करायचं होतं, पण रॉबिन ख्रिश्चन आणि शीतल हिंदू असल्यामुळे त्यांना बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागला. या लग्नाला दोघांच्याही घरातील मंडळी सहमत नव्हती.

पण उथप्पाने लग्नाचा प्रस्ताव तिच्या घरी दिला होता. त्याचवेळी प्रपोज करतांना शीतल थोडीशी संकोच करत होती पण तिनेही मानले की आता या दोघांसमोर मोठा प्रश्न म्हणजे कुटुंबाला कसे पटवायचे. सरतेशेवटी या दोघांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या लग्नाला परवानगी दिली आणि रॉबिनचा जीव भांड्यात पडला. 2016 मध्ये वेगवेगळ्या धर्मांच्या कायद्यानुसार त्यांचे दोनदा लग्न झाले. प्रथम ख्रिश्चन धर्माच्या रीतीनुसार 3 मार्च 2016 रोजी लग्न झाले होते त्यानंतर हिंदू विधीनुसार 11 मार्च रोजी लग्न झाले होते.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हे पाच भारतीय क्रिकेटपटू आहेत निवृत्तीच्या वाटेवर; लवकरच करु शकतात घाेषणा ….!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here