आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

या बाबाच्या चमत्कारामुळे इंदिरा गांधी प्रधानमंत्री झाल्या होत्या..


भारत आणि भारताच्या संस्कृतीमध्ये ऋषीं मुनींना एक महत्वाचं स्थान आहे. भारतात ऋषीं मुनींच्या कहाण्या आजही अनेक लोकांच्या तोंडून ऐकायला मिळतात.

असाच काहीसा किस्सा देशाच्या तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्यासोबत सुद्धा जोडला जात आला आहे. या बाबाच्या आशीर्वादामुळेच इंदिरा गांधी प्रधानमंत्री झाल्याच्या चर्चा झाल्या. आणि संपूर्ण देशभरासाह या बाबाचा आशीर्वाद घेण्यासाठी विदेशातील लोकही भारतात यायला लागले.

 

new google

या बाबाने आपल वय, सिद्धी तप आणि औषधी विषयी काहीही खुलासा केला नाहीये. बाबा नेहमीच सरळ आणि साधं जिवन जगत आले आहेत.

हे बाबा म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून देवरहा बाबा होते. देवहरा बाबांना भेटण्यासाठी देश विदेशातून लोक यायचे. एका मान्यतेनुसार बाबा देवी शक्तीने परिपूर्ण होते. त्यामुळे त्यांचे भक्त सुद्धा त्यांना त्याच नावाने ओळखत.

 

हे बाबा 200तें 250वर्ष जगले होते. 1990 मध्ये 19जूनला बाबाने शेवटचा श्वास घेतला.

 

बाबाच्या सिद्धिविषयी सांगताना लोक सांगत की, बाबा पाण्यावर सुद्धा चालू शकतं असत. महत्वाचं म्हणजे बाबाने आयुष्यभरासाठी कधीही एका जागेवरून दुसऱ्या जागेवरून जाण्यास कधीही वाहणाचा वापर केला नाही. प्रत्येक वेळी बाबा प्रयागराज ला जात असत. बाबा बिना श्वास घेता यमुना नदीमध्ये बसत असत.

देवराहा बाबाचे भक्त नेहमीच त्यांच्या चमत्काराच्या कथा लोकांना सांगत आले आहेत. त्यांच्यामते आपातकालीन स्थितीत इंदिरा गांधी बाबांच्या आशीर्वाद घेण्यास आल्या होत्या. त्यावेळी बाबांनी त्यांना हात उचलून पंजानी आशीर्वाद दिला होता. तेथून वापस येताच इंदिरा गांधी यांनी आपल्या पक्षाचं चिन्ह हाताचा पंजा घोषित केले. त्याच्या नंतरं काहीच दिवसात 1980मध्ये इंदिरा गांधीच्या नेतृत्वात प्रचंड बहुमताने काँग्रेस विजयी झाली. आणि इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान झाल्या.

इंदिरा गांधीच्या या विजयामध्ये बाबांचा मोठा हात असल्याच्या चर्च्या त्यावेळी गाजल्या होत्या.

इंदिरा गांधी

भक्त आजही बाबाविषयीं बोलताना सांगतात की, बाबा आलेल्या लोकांचे हाल त्यांना न विचारता त्यांना सांगत असत. त्यांच्या आयुष्यात घडलेलं पहिले पराक्रम तें सांगत असत आणि नंतर त्यांना त्यांना असलेल्या अडचणी विचारत असत.

देशाचे महान विभूती डॉ. राजेंद्र प्रसाद,मदन मोहन मालवीय,इंदिरा गांधी,अटल बिहारीं वाचपेयी,मुलायम सिंह यादव,जगन्नाथ मिश्रा यांसारखे अनेक मोठे नेते या बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या आश्रमात नेहमी जात असत.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here