आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम | युट्यूब

===

युवा प्राध्यापकाने विद्यार्थ्यांना अॉनलाईन धडे देत कसली शेती; एकरी घेतले विक्रमी ८० क्विंटल अद्रक उत्पादन


 

वाढती महागाई, शेतमजुरांचा अभाव, अनिश्चित हवामानाचा बसणारा फटका, बदलते शेतीविषयक धोरण यामुळे हल्लीची तरुणाई शेतीकडे फारसे वळताना धजावत नाहीत. मात्र दुसरीकडे एका तरूण प्राध्यापकाने शेतीची कास धरली असून त्याला आधुनिकतेची जोड देत तोट्यात जाणार्‍या शेती व्यवसायाला पुनर्जीवित केले. आपल्या 1 एकर शेतीमधून त्याने विक्रमी ८० क्विंटल अद्रकचे उत्पादन घेऊन शेतीतला प्रयोग यशस्वी करून दाखविला अाहे. प्रा. पंकज चंद्रशेखर पाटील असे या युवा शेतकऱ्याचे नाव आहे.

अद्रक

new google

२८ वर्षीय प्रा. पंकज पाटील हे लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील तादलापूर या गावचे रहिवासी. सोलापूर विद्यापीठातून त्यांनी एम एस्सी ची पदवी घेतली. त्यांची पारंपरिक २५ एकरची शेती. हावगीस्वामी महाविद्यालय उदगीर
येथे ते अध्यापनाचे कार्य करतात.

पाटील यांचे वडील चंद्रशेखर हे आपल्या शेतीत ज्वारी, गहू, सोयाबीन यासारखी पारंपरिक पिके घ्यायचे. मात्र, या पारंपारिक पिकांमध्ये फारसे काही उत्पादन होत नव्हते. पण पंकज यांनी अातापर्यंत घेतलेल्या ज्ञानाचा फायदा शेतीमध्ये शेती साठी लावला. शेतीमध्ये प्रयोग करण्याचे ठरविले. यासाठी त्यांनी विविध प्रगतशील शेतकर्‍यांची भेट घेऊन त्यांची माहिती घेतली.

दरम्यान, कोरोनामुळे गेल्या वर्षी लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळे शाळा व महाविद्यालये बंद ठेवावे लागले. ऑनलाईन क्लासेस सुरू झाले. त्यामुळे श्री पाटील यांनी नेटवर्क व्यवस्थित यावे, यासाठी शेतामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना अध्यापन करू लागले. दिवसभर शेतात राहिल्याने त्यांना शेती पाहण्यासाठी वेळ मिळाला. क्लास संपला की ते शेतीत रमू लागले.

अद्रक

सुरुवातीला त्यांनी पाच हजार रुपये खर्च करून एकरी ११ क्विंटल अदरकचे बी लावले. पाण्याच्या व्यवस्थापनासाठी ड्रीपची सोय केली. यासाठी ५५ हजार रुपये खर्च केला. खते, बियाणे आणि शेतमजूर मिळून एक लाख ७५ हजार रुपयांचा खर्च केला.

अद्रकची लागवड मागील वर्षी २६ मे रोजी केली होती. दहा महिन्यांनंतर एक एकर शेतीमध्ये अद्रकचे ८० क्विंटल उत्पादन झाले. वास्तविक पाहता लातूर हा जिल्हा सोयाबीन आणि ऊसासाठी प्रसिध्द आहे. ऊस पट्ट्यात अद्रकचे हे विक्रमी उत्पादन घेत पाटील यांनी एक यशस्वी शेती प्रयोग करून दाखविला. या उत्पादनातून आता जवळपास ४ लाख रुपयाचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.

ही अद्रक नांदेड आणि हुमनाबाद येथील प्रसिद्ध बाजारपेठेत विक्रीस जाणार आहे. अद्रक व्यतिरिक्त सध्या प्रत्येकी एक एकर शेतीत सीताफळ आणि पेरुची तर तीन एकर परिसरात ऊसाची लागवड केली आहे.

अद्रक

शेतमाल प्रक्रिया उद्योग हा सर्वोत्तम पर्याय
–  प्रा. पंकज पाटील

शेतीला आता एक फायदेशीर व भरवश्याचा जोडधंदा असणे गरजेचे आहे व यालाच शेतमाल प्रक्रिया उद्योग हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. शेतमाल ही ग्रामीण भागात सहज उपलब्ध होणारी गोष्ट असून अल्प सुविधांमध्ये आपण प्रक्रिया उद्योग सुरु करु शकतो. या मार्फत आपण आपल्याबरोबर इतरांना देखील रोजगार उपलब्ध करुन देऊ शकतो.

भारतीय नागरिकांची जीवनशैली बदलत असून, ‘रेडी टू इट’ आणि ‘रेडी टू कुक’ उत्पादनांना ग्राहकांची मागणी आहे. शेतकर्‍यांनी प्रक्रिया उद्योगाकडे वळले पाहिजे. भविष्यात मी पेरू पासून जॅम आणि सीताफळांच्या गरापासून  विविध पदार्थ बनवणारे प्रक्रिया उद्योग सुरू करणार आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण वाचा..

मुलांनी म्हातारपणी वाऱ्यावर सोडलेल्या या वयस्कर जोडप्याला सोशल मिडीयाने तारलय…!

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण वाचा..

मुलांनी म्हातारपणी वाऱ्यावर सोडलेल्या या वयस्कर जोडप्याला सोशल मिडीयाने तारलय…!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here