आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

 

मनोरुग्णांचे वाली बनलेत ‘आतिश आणि राणी’,संभव फाऊंडेशनच्या माध्यमातून बेघरांना दिला सहारा…


 

रस्त्याच्या कडेला फिरणारे बेघर, निराधार, मनोरुग्ण हे देखील समाजाचा घटक असूनही यांची हेटाळणी केली जाते.
माणसासारखे माणूस असून देखील मनोरुग्ण आजही वंचितच राहत आहेत. हे चित्र बदलणे गरजेचे होते. या मनोयात्री लोकांना चांगली वागणूक मिळावी, म्हणून त्यांच्या पुनर्विकासासाठी सोलापूर शहरातील एक दाम्पत्य झटत आहे. समाजातील हा घटक मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धडपड करणाऱ्या या दाम्पत्याचे नाव आहे, अतिश कविता लक्ष्मण आणि त्यांची पत्नी राणी शिरसट.

new google

मनोरुग्ण

सोलापूर शहरामध्ये बेवारस अवस्थेत असणाऱ्या मनोरुग्णांना भेटल्यावर येणाऱ्या अस्वस्थतेमधून प्रथम सन २०१६ पासून कामाची सुरूवात झाली. अतिश व त्यांच्या सहकाऱ्यांनी एका मनोरुग्ण महिलेला तीच्या घरी पोहोचण्यास मदत केली. या प्रसंगातून प्रेरणा घेऊन आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातून १७० पेक्षा जास्त बेवारस व घरातून बाहेर पडून भटकणाऱ्या मनोरुग्णांनाच पुनर्वसन केलं आहे. त्यातील ७० रुग्णांना हक्काचा निवारा मिळवून देण्यास यश आले आहे. यासोबत वृद्ध व आजारी व्यक्तींना देखील मदत करण्यासाठी संभव फाउंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात.

गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगाला कोरोनाने वेठीस धरले आहे. टाळेबंदीच्या काळात भलेभले हतबल झाले. अश्या कठीण परिस्थितीतही हे शिरसट दाम्पत्य या मनोरुग्णांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करत होते. त्यामुळे अनेक बेघर, निराधार आणि मनोयात्री लोकांची भूक भागू शकली.

कोरोनाकाळात या लोकांसाठी शहरातील नाइट शेल्टर खुले करावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. संस्थेच्या या मागणीला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत नाइट शल्टर खुले केले. त्यामुळे अनेक बेघरांना कोरोना काळात सहारा मिळाला.

यासह कोरोना काळात या संस्थेने विविध समाजोपयोगी कार्यक्रम हाती घेतले. यात गरीब अाणि कामगार वर्गातील लोकांसाठी मास्क आणि अन्नधान्याचे वाटप कार्यक्रम करण्यात आला. सर्वसामान्य कुटुंबातील लाखो लोकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात केली होती. घरोघरी क्वारंटाइन मध्ये असलेल्या लोकांना घरपोच जेवण पोहोचवले. शहरात कोरोनाविषयी जनजागृती मोहीम घेतली. सोलापुरात उन्हाळा तीव्र असतो. हे लक्षात घेऊन स्थलांतरित मजुरांना चप्पल, चादर, छत्री, पाणी बॉटलचे वाटप केले.

तसेच स्लम एरियामध्ये सोडियम हायड्रोक्लोरिक औषधांची फवारणी केली.

मनोरुग्ण

२० स्वयंसेवकांची टीम समाजकार्यात करते मदत 

अतिशय आणि राणी यांच्या उल्लेखनीय समाजकार्याला २० स्वयंसेवकांची टीम सहकार्य करत असते. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून ही टीम अविरतपणे प्रयत्न करत आहे. या टीममधील सर्व स्वयंसेवक हे युवा असून आपली जबाबदारी पार पाडून ते समाजकार्याला हातभार लावतात. बेघर मनोरुग्णांसाठी पुनर्वसन केंद्र उभे करणे व सेवा पुरवणे. वयोवृद्ध, निराधार व्यक्तींना आरोग्यविषयक सुविधा पुरविणे. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संदर्भात जनजागृती करणे हे संभव फाउंडेशनचे उद्दिष्ट आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here