आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

या छंदवेड्या अवलियाचे ट्रक भरून बातम्यांच्या कात्रणांचा संग्रह जमा केलाय….!


 

प्रत्येक व्यक्ती आयुष्यात काही ना काही छंद जोपासत असतो. या जोपासलेल्या छंदामुळे मानसिक समाधान तर मिळतेच शिवाय त्याचा समाजालाही उपयोग होतो. यापूर्वी आपण जुनी नाणी, ऐतिहासिक अाणि प्राचीन दुर्मीळ वस्तू जोपासल्याचे पाहिले असेलच. दुसरीकडे एका अवलियानं वर्तमानपत्रात छापून येणाऱ्या विविध विषयांवरील बातम्यांच्या कात्रणांचा ट्रंक भरून संग्रह केला आहे. या छंदवेड्या अवलियाचे नाव आहे संतोष चौंडेवार.

 बातम्या

new google

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात राहणारे संतोष चौंडेवार एक हॉटेल व्यावसायिक अाहेत. ४९ वर्षीय  संतोष यांनी मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण घेतले. त्यांना लहानपणापासूनच वर्तमानपत्र वाचण्याची आत्यंतिक आवड होती. साधारण: चौथ्या-पाचव्या वर्गात शिकत असल्यापासून ते वर्तमानपत्रांचे वाचन करत असत. वय, वर्ग वाढत गेले तशी त्यांची वर्तमानपत्र वाचण्याची सवय वाढत गेली. त्यानंतर त्यांना तसा छंदच लागला. गावात असलेल्या वाचनालयात जाऊन स्वत:ची वाचनाची आवड आणि हौस भागवत असत.

वर्तमानपत्राच्या वाचनासोबत त्यांना अजून एक सवय जडली होती. ती म्हणजे वर्तमानपत्रातील विविध विषयांवर आलेल्या आणि चालू घडामोडींशी संबंधित बातम्यांच्या कात्रणांचा संग्रह करू लागले. यातून त्यांनी आपला हा अनोखा छंद जोपासला.
त्यांच्या या संग्रहात सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, विज्ञान, खेळ, पर्यावरणा संबंधित बातम्या, कात्रणे, संपादकीय लेख यांचा समावेश आहे.

गेल्या २० वर्षापासून ते वर्तमानपत्रातील कात्रणं कापून त्याचे अल्बम करण्याची आवड जोपासत आहेत. कोणतीही घटना घडली आणि पेपरात त्याची चित्रासह माहिती आली की त्याचं कात्रण काढून अल्बम बनवितात.

संतोष चौंडेवार सांगतात, जवळपास एक ट्रंक भरून बातम्यांच्या कात्रणांचा संग्रह माझ्याकडे आहे. हा संग्रह माझा खजिना आहे. पेपर एका महिन्यानंतर रद्दीत जातात. त्यामुळे नंतर या सा‍ऱ्या घटनांचा आढावा घ्यायचा झाला तर माझे हे अल्बम खूप उपयोगी पडतील. ही आवड मी अनेक वर्षापासून जोपासतोय. लोकांना अशा जुन्या बातम्यांची माहिती या अल्बममधून देणं मला फार आवडतं. या संग्रहामुळे मनाला समाधान मिळते.

बातम्या

अत्यंत दुर्मीळ घटनांची माहिती या संग्रहात आहे. या बातम्यांच्या कात्रणांचा संग्रह मला पुस्तकरूपात प्रकाशित करायचा आहे.

 

रोज तीन ते चार वर्तमानपत्राचे वाचन 

संतोष चौंडेवर यांना पुस्तकांपेक्षा वर्तमानपत्र वाचायला खूप आवडतात. म्हणून ते जवळपास तीन ते चार वर्तमानपत्राचे रोज वाचन करतात. आपल्या व्यवसायातून मिळालेला २-३ तासांचा वेळ ते वाचनासाठी खर्च करतात. यातील आवडलेले लेख आणि बातम्या एका कागदावर व्यवस्थेत चिटकवून ठेवतात. त्यांचा हा संग्रह पाहून अनेक जण त्यांचे कौतुक करतात. कोणत्याही विषयासंबंधी माहिती हवी असल्यास त्यांच्याकडे चौकशीही करतात. आणि चौंडेवार त्यांना ती माहिती उपलब्ध करून देतात

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here