आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

हा कलाकार करतोय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची विनामोबदला सेवा!


 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने गतवर्षीप्रमाणे याही वर्षी राज्यात लॉकडाऊन लागू केला. त्यामुळे सर्वच क्षेत्र ठप्प झाले. त्यापैकीच एक म्हणजे कला क्षेत्र. लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने अनेक कलाकार घरीच होते. लॉकडाऊन काळात मिळालेल्या या वेळेचा उपयोग एक कलाकार कोविड सेंटरमधील कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी देत आहे. मागील महिन्यापासून तो कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची विनामोबदला सेवा करत आहे. प्रतीक चिंदरकर असे या कलाकाराचे नाव आहे.

उत्तर सोलापूर तालुक्याच्या नान्नज या गावात राहणारा ३५ वर्षीय प्रतीक चिंदरकर हा व्यवसायाने कोरिओग्राफर आहे. लहानपणापासून नृत्याची आवड असल्याने तो आपले करिअर घडवण्यासाठी चार वर्षांपूर्वी पुणे येथे आपल्या कुटुंबासह स्थायिक झाला. दरम्यान गतवर्षी लॉकडाऊन लागू झाले. यामुळे तो घरीच बसून होता. मागील वर्षी कोरोनाकाळात तो पुण्यातील अनेक गरीब लोकांना एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जेवणाचे डबे पुरवण्याचे काम करत होता. त्यानंतर कलाक्षेत्र पूर्वीप्रमाणे पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला.

new google

कोरोना

लॉकडाऊन असल्यामुळे कुठेही बाहेर जाता येत नव्हते. त्यामुळे तो आपल्या गावी परतला. अशावेळी सामाजिक क्षेत्राची आवड असलेल्या प्रतीकला त्याचे मन स्वस्थ बसू देत नव्हते. घरी बसण्याऐवजी कोविड काळात काहीतरी सामाजिक सेवा करावी असा विचार त्याच्या मनात यायचा. अखेर त्याने कोविड सेंटरमध्ये ब्रदर म्हणून विनामोबदला सेवा आरोग्य सेवा देण्याचे ठरविले. एएनएम (नर्सिंग कोर्स)चे शिक्षण घेतलेल्या प्रतीक नान्नज येथील कोविड सेंटरमध्ये आपल्या ज्ञानाचा उपयोग सेवा म्हणून करू लागला. लॉकडाऊन संपेपर्यंत तो आरोग्यसेवा देत राहणार असल्याचे त्याने सांगितले.

प्रतीकची आई शीतल चिंदरकर या हॉस्पिटलमध्ये गेल्या २६ वर्षांपासून ‘सिस्टर’ म्हणून काम करत आहेत. अाज आई आणि मुलगा मिळून एकाच हॉस्पिटलमध्ये अारोग्य सेवा देत आहेत. विविध गाण्याचे कोरियोग्राफ आणि इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करणार्‍या प्रतीकला सोलापूर शहरातील सर्वच कोविड सेंटरमध्ये कोरोनाविषयी जनजागृती करायची आहे. यासाठी त्याने प्रशासनाला विनंती केली आहे. कोरोनासारख्या भयानक काळाचे भान ओळखत आपले कर्तव्य बजावणार्‍या या कोरोना योद्ध्यांचं सर्वत्र कौतुक करत आहेत.

कलाक्षेत्रात दिले भरीव योगदान 

प्रतीक हा पुणे येथे प्रतीक डान्स अकॅडेमी चालवतो. आपल्या कलेच्या माध्यमातून तो बालकामगार, शेतकऱ्यांची आत्महत्या, स्त्रीभ्रूणहत्या, स्वच्छता अभियान यासारख्या ज्वलंत विषयावर तो प्रबोधनात्मक सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम घेतो. तसेच विविध टीव्ही चॅनलच्या साँगमध्ये तो नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी पार पाडली आहे. कला क्षेत्रातील त्याच्या योगदानाची दखल घेत विविध सामाजिक संस्थांनी त्याला पुरस्कार देऊन त्यांचे कौतुक केले आहे. महिलांच्या अत्याचाराला वाचा फोडणारे ‘चुकी झाली देवा तुझी’ या गीताची स्टोरी आणि असिस्टंट डायरेक्टर म्हणून त्यांनी काम पाहिले आहे

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा

या छंदवेड्या अवलियाचे ट्रक भरून बातम्यांच्या कात्रणांचा संग्रह जमा केलाय….!

शरीरात जास्त प्रमाणात व्हिटॅमिन डी झाल्यास शरीरास होते हे मोठे नुकसान…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here