Reading Time: 2 minutes

आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

‘द वॉल’ राहुल द्रविड झाला प्रशिक्षक: भारतीय संघाला देणार कानमंत्र !


 

माजी भारतीय कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकाडमीचे प्रमुख राहुल द्रविड याची श्रीलंका दौर्‍यासाठी भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय संघ जुलैमध्ये श्रीलंकेविरूद्ध 6 सामन्यांची मालिका खेळणार आहे.  द्रविड मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी संघाचा प्रशिक्षक असेल आणि भारतीय खेळाडूंना फलंदाजी आणि गोलंदाजीचे धडे देईल.

राहुल द्रविड

दुसर्‍यांदा मिळाली संधी

तत्पूर्वी, राहुल द्रविडचा 2014 मध्ये इंग्लंड दौर्‍यावर भारतीय फलंदाजी सल्लागार म्हणून समावेश होता. वरिष्ठ पुरुष संघात कोचिंगची संधी मिळवण्याची ही दुसरी वेळ आहे. वस्तुतः टीम इंडियाचा कोचिंग स्टाफ जुलैमध्ये यूकेमध्ये असेल, त्यामुळे युवा संघाला प्रशिक्षणाची जबाबदारी भारतीय संघात द वॉल म्हणून ओळखला जाणार्‍या राहुल द्रविड वर असेल. ही त्याच्यासाठी  देण्यात आलेली उत्तम संधी आहे.

प्रशिक्षकाची यशस्वी कारकिर्द

राहुल द्रविडने 19 वर्षांखालील आणि भारत-अ संघातील खेळाडूंना प्रशिक्षण दिले आहे. त्याच्या प्रशिक्षकाखालीच भारताचा 29 वर्षाखालील संघ  2016 मध्ये विश्वचषक उपविजेते बनला आणि 2018 मध्ये विजेता ठरला. याआधी ते आयपीएल संघ राजस्थान रॉयल्स (आरआर) चे प्रशिक्षक होता.  त्याच्या प्रशिक्षणाखालीच राजस्थानने 2013 मध्ये लीग प्लेऑफ सामना खेळला होता.

पंत-सुंदर आणि शॉसारखे घडविले खेळाडू

भारतीय संघातर्फे खेळताना रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, ईशान किशन, पृथ्वी शॉ या खेळाडूंना घडविण्यामध्ये राहुल द्रविडचा मोठा वाटा आहे. 19 वर्षांखालील संघाचा मुख्य प्रशिक्षक असताना द्रविडने या खेळाडूंना प्रशिक्षण दिले. आता हे सर्व खेळाडू आयपीएलसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमक दाखवत आहेत.

राहुल द्रविड

सहा सामन्यांची मालिका

भारत आणि श्रीलंका यांच्यात 13 ते 27 जुलै दरम्यान एकूण 6 सामने खेळले जातील. ज्यामध्ये तीन एकदिवसीय सामने आणि 3 टी -20 सामन्यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या मालिकेस सहमती दर्शविली होती. गेल्या वर्षी जूनमध्ये भारत श्रीलंकेचा दौरा करणार होता, परंतु कोरोनामुळे ते रद्द करण्यात आले.  तथापि, यावेळी बीसीसीआयला श्रीलंका दौर्‍यावर संपूर्ण नवीन संघ निवडावा लागेल, कारण विराट कोहलीपासून ते रोहित शर्मापर्यंत प्रत्येकजण इंग्लंड दौर्‍यावर असतील. अशा परिस्थितीत संघ आयपीएलमधील युवा चेहर्‍यांना संधी दिली जाऊ शकते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा

या छंदवेड्या अवलियाचे ट्रक भरून बातम्यांच्या कात्रणांचा संग्रह जमा केलाय….!

शरीरात जास्त प्रमाणात व्हिटॅमिन डी झाल्यास शरीरास होते हे मोठे नुकसान…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here