Reading Time: 2 minutes

आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

इंग्लंडच्या 45 वर्षीय खेळाडूची वादळी खेळी: 190 धावांची खेळी करून सर्वांचे वेधून घेतले लक्ष्य!

 


 

क्रिकेटमध्ये ज्या वयात खेळाडू सामान्यत: निवृत्ती घेऊन घरी बसून क्रिकेट पाहण्याचा आनंद घेतात, त्या वयात इंग्लंडचा अष्टपैलू डॅरेन स्टीव्हन्सने 190 धावांचा डाव खेळून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. काऊन्टी चॅम्पियनशिपमध्ये केंटकडून खेळताना 45 वर्षीय स्टीव्हन्सने केवळ 149 चेंडूत 190 धावांचे तुफानी डाव खेळला. केंटच्या संघाने एका वेळी 128 धावा देऊन 8 गडी गमावले आणि त्यानंतर स्टीव्हन्सच्या डावामुळे संघाला 307 धावांच्या सन्मानजनक धावसंख्या गाठण्यास मदत झाली.

45 साल के बल्लेबाज ने मचाई तबाही, 30 गेंदों में ठोके 150 रन, 166 की  साझेदारी में दूसरे ने बनाया सिर्फ 1 रन | Kent's 45 Years Old Darren Stevens  Scores 190

स्टीव्हन्सने आपल्या खेळीदरम्यान 15 चौकार आणि 15 लांब षटकार ठोकले. हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील स्टीव्हन्सचे 36 वे शतक होते. त्याच्या व्यतिरिक्त संघातील अन्य फलंदाज ग्लोमर्गनच्या गोलंदाजांचा सामना करु शकले नाहीत आणि एकेक करून माघारी परतत राहिले. स्टीव्हन्स सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी बाहेर आला आणि जोरदार फटकेबाजी करीत मैदानाच्या चारही दिशेने शॉट मारत होता.

केंटच्या या फलंदाजाने 7 षटकारांच्या मदतीने 92 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर स्टीव्हन्सने पुढच्या 57 बॉलमध्ये 100 पेक्षा जास्त धावा फटकावल्या. यापूर्वी त्याने गोलंदाजीत मार्लनस लब्युशेनची विकेटही घेतली होती. स्टीव्हन्स मात्र आपले दुहेरी शतक पूर्ण करण्यासाठी केवळ 10 धावांची गरज होती. मात्र तो द्विशतक पूर्ण करु शकला नाही.

खेळाडू

1997 मध्ये पदार्पण करणार्‍या डेरेन स्टीव्हन्सने आतापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 314 सामने खेळले आहेत आणि 34.65 च्या सरासरीने 15 हजार 940 धावा केल्या आहेत.

यावेळी त्याने 35 शतके आणि 80 अर्धशतके झळकावली आहेत. स्टीव्हन्सने गोलंदाजीतही उत्कृष्ट कामगिरी केली असून त्याने 564 बळी घेतले आहेत. टी -20 क्रिकेटमध्येही स्टीव्हन्सची कामगिरी भक्कम आहे आणि त्याचा स्ट्राइक रेट 136.41 आहे, तर केंट अष्टपैलूने गोलंदाजीत 114 बळी टिपले आहेत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा

या छंदवेड्या अवलियाचे ट्रक भरून बातम्यांच्या कात्रणांचा संग्रह जमा केलाय….!

शरीरात जास्त प्रमाणात व्हिटॅमिन डी झाल्यास शरीरास होते हे मोठे नुकसान…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here