आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

मोहनलाल यांचा चित्रपट आला की बॉलीवूड त्याचा रिमेक करणार हे ठरलेलंच…


 

मलयलम चित्रपट इंडस्ट्रिचे सुपरस्टार मोहनलाल हे आपल्या करियरमध्ये 360 पेक्षाही जास्त चित्रपट करणारे आणि त्यातील बहुतांश चित्रपट हिट करणारे इकमेव कलाकार आहेत.

मोहनलाल यांच्या अनेक गोष्टी बॉलिवूडमध्ये कॉपी केल्या जातात. मलयालम चित्रपट इंडस्ट्रीतील सर्वांत जास्त मानधन घेणारे मोहनलाल यांच्या तब्ब्ल 10 सिनेमाचा रिमेक बॉलिवूडमध्ये केलाय. एवढंचं नाही तरं कॉपी केल्या गेलेल्या या सिनेमांमध्ये बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्यांनी कामं केल आहे.

new google

मोहनलाल

रिमेक करण्यात आलेल्या या सिनेमांपैकी काही फ्लॉप ठरले तरं काही हिट झाले. जाणून घेऊया कोणते आहेत ते सिनेमे.

दृश्यम:

2013मध्ये आलेला मोहनलाल यांचा सिनेमा सस्पेन्स सिनेमा दृश्यमचा रिमेक बॉलिवूडमध्ये करण्यात आला. ज्यात लीड रोल मध्ये अजय देवगण,तब्बू, श्रेया सरण यांसारखी तगडी काष्ट होती. या सिनेमा हिट राहिला होता.

 

बोईंग बोईंग

1985मध्ये आलेला मोहनलाल यांचा सिनेमा बोईंग बोईंग याचा सुद्धा रिमेक बॉलिवूड मध्ये करण्यात आला. 2005मध्ये बॉलिवूडने हा सिनेमां गरम मसाला नावाने प्रदर्शित केला.ज्यात अक्षय कुमार,जॉन अब्राहिम लीड रोल मध्ये होते. अक्षय सारखा स्टार अभिनेता असूनसुद्धा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फार काही चालू शकला नाही.

मोहनलाल

भूलभुलैय्या:

मोहनलाल यांचा 1993मध्ये आलेला ब्लॉकबास्टर सिनेमा मनीचित्राथाजूचा हिंदी रिमेक करण्यात आला. बॉलीवूडमध्ये भूलभुलैय्या नावाने प्रदर्शित करण्यात आलेल्या या सिनेमात अक्षय कुमार, विद्या बालन, आणि अमिषा पटेल मेन भूमिकेत होते. हा सिनेमा सुपरहिट ठरला होता.

गर्दीश

1989मध्ये आलेला मोहनलाल यांचा सुपरहिट सिनेमा ‘किरिदम’चा रिमेक गर्दीश नावाने बॉलिवूड मध्ये करण्यात आला. या सिनेमात सिनेमात जॅकी श्रॉफ, डिम्पल कबाडिया,अमरीश पुरी लीड रोल मध्ये होते. हा सिनेमा फ्लॉप ठरला होता.

मोहनलाल
हंगामा

1984मध्ये आलेला मालयलम सिनेमा पूछकोरू मुक्कृतीचा सुद्धा बॉलिवूडमध्ये रिमेक करण्यात आला होता. हा चित्रपट बॉलिवूडमध्ये हिट झाला होता. सिनेमात अक्षय खन्नासोबत आफताब शिवदासनी लीड रोल मध्ये होते.

सात रंगके सपने

1994मध्ये आलेला थेनमावीन कोंबातचा रिमेक करण्यात आला.सात रंगके सपने नावाने हा सिनेमा बॉलिवूडमध्ये प्रदर्शित करण्यात आला.
सिनेमात अरविंद स्वामी आणि जुही चावला लीड रोलमध्ये होते. हा सिनेमाही बॉलिवूडमध्ये स्पेशल अपयशी ठरला होता.

ये तेरा घर ये मेरा

मोहनलाल यांचा 1986 मध्ये आलेला हिट चित्रपट सनमनस्सूल्लावार्धक समाधानमचा सुद्धा हिंदी रिमेक बनवण्यात आला.
सुनील शेट्टी आणि महिमा चौधरी मेन रोलमध्ये असलेला हा सिनेमा बॉलिवूडमध्ये प्रेक्षकांची मने जिंकण्यासअपयशी ठरला होता.

मोहनलाल

खट्टा-मिठा

1988मध्ये आलेला वेलानाकालुडी नाडूचा हिंदी रिमेक करण्यात आला होता.ज्यात अक्षय कुमार मेन भूमिकेमध्ये होता. या रिमेक सिनेमा खट्टा-मिठा नावाने प्रदर्शित करण्यात आला होता. हा सिनेमांसुद्धा अपयशी ठरला होता.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

भारतीय सेना अधिकारी सांगून केली तब्बल 17 मुलींची फसवणूक….घातला 80 करोड रुपयांना गंडा

सावधगिरी बाळगा जेव्हा तोंडामध्ये अशी लक्षणे दिसतील, तोंडाच्या कर्करोगाचा धोका असू शकतो!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here