आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

दिलीपकुमार-राज कपूर यांच्या घराचे होणार संग्रहालयात रुपांतर; पाकिस्तान करतोय कोट्यवधी रुपये खर्च !


 

पाकिस्तान येथील खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या सरकारने पेशावरमधील बॉलिवूडचे महान अभिनेता राज कपूर आणि दिलीप कुमार यांचे वडिलोपार्जित घर खरेदीसाठी 2.30 कोटी रुपये दिले आहेत. पुरातत्व खात्याने ही रक्कम पेशावरच्या उपायुक्तांकडे सुपूर्द केली आहे. दोन्ही हवेलींच्या सध्याच्या मालकांना खरेदीसाठी अंतिम नोटीस बजावल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. खैबर पख्तूनख्वाचे पुरातत्व संचालक अब्दुस समद म्हणाले की, सरकार दोन्ही घरांचा ताबा घेईल आणि त्या वास्तूला जुन्या स्वरूपात बदल करण्याचे काम सुरू होईल.

दिलीपकुमार

new google

ते म्हणाले की सरकार या दोन्ही इमारतींचे संरक्षण करेल जेणेकरुन फिल्म इंडस्ट्रीत दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या योगदानाबद्दल लोकांना माहिती व्हावी. खैबर पख्तूनख्वा सरकारने दिलीपकुमार यांच्या घरासाठी अनुक्रमे 1.50 कोटी आणि 80 लाख रुपये निश्चित केले आहेत. भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशमधील भूमी मोजण्याचे जुने प्रमाण म्हणजे एक  मरला 272.25 चौरस फूट इतके आहे.

दिलीपकुमार

कपूरच्या हवेलिचे सध्याचे मालक अली कादिर यांनी 20 कोटींची मागणी केली आहे, तर दिलीपच्या घराचे सध्याचे मालक गलीप रहमान मोहम्मद म्हणाले की, सरकारने हे घर 3.50 कोटींच्या बाजार भावाने खरेदी करावे. राज कपूर यांचे वडिलोपार्जित निवासस्थान पेशावरच्या किस्सा ख्वानी बाजारात आहे, जिचे आजोबा दीवान बश्वेश्वरनाथ कपूर यांनी 1918 ते 1922 या काळात बांधले होते. दिलीप कुमार यांचे वडिलोपार्जित घरही याच भागात आहे.

 

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा

या छंदवेड्या अवलियाचे ट्रक भरून बातम्यांच्या कात्रणांचा संग्रह जमा केलाय….!

शरीरात जास्त प्रमाणात व्हिटॅमिन डी झाल्यास शरीरास होते हे मोठे नुकसान…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here