आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

आश्चर्यम! भारतात ‘या’ प्राचीन मंदिरात केली जाते चक्क बेडकाची पूजा!


 

भारतात अशी अनेक मंदिरे आहेत, जिथे प्राण्यांची पूजा केली जाते. मंदिरात तर चक्क बेडकाची पूजा केली जाते. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. याचा आपण विचारदेखील करू शकत नाही. पण हे खरे आहे भारतात असे एक मंदिर आहे, जिथे बेडकाची पूजा केली जाते. याच मंदिराची आज आपण माहिती पाहणार आहोत.

 बेडक

new google

भारतातील हे एकमेव बेडूक मंदिर उत्तर प्रदेशमधील लखीमपूर-खेरी जिल्ह्यातील ‘तेल’ शहरात आहे. जे लखनौ विमानतळापासून 135 कि.मी. अंतरावर आहे. असे म्हणतात की, हे मंदिर सुमारे 200 वर्ष जुने आहे. असा विश्वास आहे की दुष्काळ, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी हे मंदिर बांधले गेले.

 

हे स्थान ओइल शैव पंथाचे मुख्य केंद्र होते आणि तेथील शासक हे भगवान शिवचे उपासक होते. या शहराच्या मध्यभागी मंडुक यंत्रावर आधारित एक प्राचीन शिव मंदिर आहे.

बेडक

 

11 व्या शतकापासून ते 19 व्या शतकापर्यंत हा प्रदेश चहमान राज्यकारभारात होता.  चमन राजवंशातील राजा बक्शा सिंग यांनी हे आश्चर्यकारक मंदिर बांधले. या मंदिराच्या स्थापत्यकलेची कल्पना कपिलाच्या एका महान तांत्रिकांनी केली होती. तांत्रिक आधारित या मंदिराची वास्तू रचना खास शैलीमुळे लोकांना मोहित करते. बेडूक मंदिरात दीपावली व्यतिरिक्त महाशिवरात्रीत भाविक मोठ्या संख्येने येतात.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

भारतीय सेना अधिकारी सांगून केली तब्बल 17 मुलींची फसवणूक….घातला 80 करोड रुपयांना गं

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here