आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

लॉकडाऊन काळात चिमुकल्यांनी तयार केली ८०० रोपे

पर्यावरण संवर्धनासाठी चिमुकल्यांचा पुढाकार


 

 

सोलापूर : एरवी शाळा, क्लास आणि मैदानात रमणारी मुलं लॉकडाऊन काळात कार्टून चॅनल्स आणि ऑनलाईन क्लासमध्ये व्यस्त झाली. पण यातूनही त्यांचा वेळ जाता जाईना. लॉकडाऊन काळात मिळालेला हा वेळ सार्थकी लावण्यासाठी आणि मुलांमध्ये क्रिएटिव्हिटी निर्माण व्हावी म्हणून पालकांनी मुलांवर हिरवाईचा (पर्यावरणाचा) संस्कार घडवला आणि मुलांनी या गतवर्षीच्या लॉकडाऊन काळापासून एकूण ८०० पेक्षा जास्त विविध झाडांची रोपे तयार केली. ही किमया साधली आहे भोपळे कुटूंबातील चिमुकल्यांनी.

new google

रोपे

 

सोलापूर शहरातील मजरेवाडी परिसरात राहणारे प्रा. अश्विनकुमार भोपळे यांनी अापला मुलगा आयर्न (वय १३), अर्जुन (९) आणि पुतण्या वीरेन (७) यांना झाडे कशी बनवितात याविषयी मार्गदर्शन केलं. मग ही तिन्ही भावंड रोपे तयार करण्यात दंग झाली. घराजवळची वाहून आलेली माती आणि घरीच साठवलेल्या बियां कागदी पिशवीत भरुन रोपे तयार करु लागली. लावलेल्या बिया पावसाळ्याच्या दिवसांत वाफवून आल्या. रोपे तयार होताच मुलांचा उत्साह वाढला अाणि मुले मोठ्या उत्साहाने रोपे तयार करू लागली. यातून जवळपास आठशेहून अधिक रोपे तयार झाली.

प्रा. अश्विनकुमार भोपळे सांगतात, बालवयातच मुलांवर पर्यावरणाचा संस्कार व्हावा आणि त्यांच्यातील सृजनशीलतेला वाव देण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला. घराजवळ बरीच फळांची झाडे आहेत. मुलांनी विविध फळांच्या अन् सावली देणाऱ्या झाडांच्या बिया गोळा करून त्यापासून रोपे तयार केली. मुलांचे आजोबा आनंदराव भोपळे आणि गोदावरी भोपळे यांनी तयार केलेल्या रोपांना रोजच्या रोज पाणी देऊन मुलांच्या कामाला हातभार लावला. झाडांचा पालापाचोळा आणि किचनमधला ओला कचरा यापासून कंपोस्ट खत तयार करुन झाडांना वापरले.

रोपे

डोक्यावरील केसांमध्ये नायट्रोजनचा घटक असतो. झाडांच्या वाढीसाठी तो पोषक द्रव्य असल्याचे मुलांच्या लक्षात आल्याने रोपे तयार करताना केसांचा वापर केला. अंड्याची टरफले कचराकुंडीत टाकण्याऐवजी ती खते म्हणून वापरली. त्यामुळे अल्पावधीतच रोपवाटिका हिरवीगार झाली. आंबा, चिकू, रामफळ, सीताफळ, पपई, खजूर, जाई-जुई, मोगरा, कडुलिंब, लिंबू  आणि शिकेकाई या वृक्षांची तयार केलेली रोपे स्वत: च्या   शेताच्या बांधावर लावण्यात येणार आहेत. जेणेकरून तयार केलेली रोपे मोठी झाल्यावर मुलांमध्ये उत्साह वाढवतील. अाणि
ही ऊर्जा मुलांना भविष्यात पर्यावरणाच्या संदर्भात कामे करण्यास बळ देईल, असे भोपळे यांनी सांगितले.

वाढदिवसाला चॉकलेट ऐवजी वाटतात फळे 

लहान मुले आपल्या वाढदिवशी शाळेत चॉकलेट किंवा शैक्षणिक साहित्य वाटतात. मात्र भोपळे कुटुंबातील मुले आपल्या वाढदिवशी चॉकलेट ऐवजी त्या-त्या सिझन मधली फळे शाळेतील मुलांना वाटतात. चॉकलेट बनवणाऱ्या सर्रास कंपन्या या विदेशी आहेत. त्यातून मिळणारा फायदा हा विदेशी कंपन्यांना होतो. चॉकलेटऐवजी फळे वाटल्यास त्याचा फायदा हा आपल्या भारतीय शेतकऱ्यांना होईल, भारतातला पैसा भारतातच राहिल या हेतूने वाढदिवशी फळे वाटत असल्याचे प्रा. भोपळे यांनी सांगितले.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

भारतीय सेना अधिकारी सांगून केली तब्बल 17 मुलींची फसवणूक….घातला 80 करोड रुपयांना गं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here