आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

सोलापूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अत्यंत वेगवान वेगाने फोफावत आहे. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि प्रशासन आपल्या परीने जीव तोडून मेहनत करत आहे. दुसरीकडे काही सामाजिक संस्थां आणि व्यक्ती कोरोनाकाळात सेवा बजावत प्रशासनाला सहकार्य करत आहेत. अशा महामारीच्या काळात शहरातील एकाच कुटूंबातील बहीणभाऊ आपले सामाजिक कर्तव्य समजून अखंड सेवा बजावत आहेत. निकिता आणि शुभम असे या बहीण भावंडांची नावे आहेत.

भाऊ गरिबांना अन्नदान करून त्यांची भूक भागवत आहे तर बहीण कोविड सेंटरमध्ये नर्स म्हणून रुग्णांची सेवा करण्यात दंग आहे. शुभम बल्ला आणि निकिता बल्ला ही बहीणभावंडे शहरातील दत्तनगर परिसरात राहतात. २३ वर्षीय शुभम हा एचएन महाविद्यालयातून एम.कॉम. चं शिक्षण घेतोय तर २१ वर्षीय नीकिताने नुकतेच जीएनएमचा कोर्स पूर्ण केला असून ती सोलापूर शहरातील प्रसिध्द हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून सेवा बजावत आहे. असे असले तरी या दोघांची भावना एकच आहे ती म्हणजे अडचणीच्या काळात लोकांना मदत करायची.

कोरोना

new google

कोरोनाकाळात सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे गरिबांच्या दोनवेळच्या जेवणाची प्रचंड हाल होत होती. अशावेळी शहरातील जयहिंद फूड बँक या सामाजिक संस्थेचा सदस्य असलेला शुभम बल्ला गरजूंपर्यंत अन्न पोहोचविण्याचे काम गेल्या चार वर्षांपासून करत आहे. आपले महाविद्यालयीन शिक्षण घेत समाजकार्याची आवड जपलेला शुभम कोरोनासारख्या महामारीत न डगमगता आपली सेवा बजावत आहे. त्यामुळे अनेक गरजू लोकांची पोटापाण्याची व्यवस्था झाली. कुणीही भूकेलेले राहू नये हीच या पाठीमागची तळमळ होती.

कोरोनाच्या दुसर्‍या धोकादायक लाटेत रुग्णालयांवरील भार वाढला आहे. त्याच डॉक्टरांसोबतच नर्स, सिस्टर आणि परिचारिका आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत आहेत. या स्थितीतही कोविड रुग्णालयातील डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून हे आरोग्य कर्मचारी निरंतर कर्तव्य बजावत आहेत. शुभमची बहिण निकिता चं वय अवघं वीस असून कमी वयात तिने धाडस करुन सुरुवातीला कँटोन्मेंट झोन आणि त्यानंतर कोविड सेंटरमध्ये रुग्णांची सेवा बजावत आहे. ती देखील गेल्या दीड वर्षापासून रात्रंदिन डॉक्टरांच्या बरोबरीने जास्त वेळ रुग्णांना सेवा देत आहेत.

रुग्णसेवेतून लाखमोलाचे समाधान

निकिता बल्ला

नर्स

हॉस्पिटलमधील एक कर्मचारी म्हणून आम्ही कर्तव्य पार पाडत असताना सर्वजण मिळून मिसळून काम करतो. या काळात आम्ही माणूस म्हणून अनेक गोष्टी शिकत आहोत. आईवडिलांनी   दिलेल्या प्रोत्साहनामुळे काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. लोकांचे आजारपण अाणि मानसिक ताणतणाव कमी करून एक प्रकारे आम्ही देशसेवाच करतोय. त्यातून मिळणारे समाधान हे लाखमोलाचे आहे. लोकांच्या चेहर्‍यावरील हास्य यातच अाम्हां बहीणभावाचं समाधान आहे.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

भारतीय सेना अधिकारी सांगून केली तब्बल 17 मुलींची फसवणूक….घातला 80 करोड रुपयांना गं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here