Reading Time: 2 minutes

आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी असा असेल संभाव्य भारतीय संघ!


 

भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडच्या संघाशी दोन हात  करणार आहे.  हा सामना साऊथॅम्प्टनच्या द रोज बाउल क्रिकेट स्टेडियमवर 18 ते 22 जून दरम्यान खेळविण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ तयार असला तरी एक समस्या संघाला सतावत आहे ती म्हणजे सलामीची जोडी. सलामीवीर म्हणून रोहित शर्माची जागा पक्की दिसतंय मात्र, दुसर्‍या सलामीवीरची समस्या भारतापुढे कायम आहे.

टेस्ट चॅम्पियनशिप

शुभमन गिल मायदेशात इंग्लंडविरूद्ध झालेल्या कसोटी मालिकेत सपशेल अपयशी ठरला. संपूर्ण कसोटी मालिकेदरम्यान तो फक्त एक अर्धशतक ठोकू शकला. त्याच्या 7 डावांमध्ये 19.83 च्या सरासरीने फलंदाजीत तो केवळ 119 धावा करु शकला. नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्येदेखील त्याची बॅट शांतच होती. त्याचा हा खराब परफॉर्मन्स पाहता विराट कोहली त्याला संघाबाहेर ठेवू शकतो.

जर शुभमन गिलला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आलं तर कर्णधार विराट कोहली त्याचा आवडता खेळाडू केएल राहुलला रोहित शर्माबरोबर सलामीला संधी देऊ शकतो.

मयंक अग्रवालच्या रूपात संघाकडं आणखीन एक पर्याय आहे.  मात्र, राहुलचा शानदार फॉर्म पाहता कर्णधार कोहली त्याला संधी देण्याची दाट शक्यता आहे. केएल राहुलनं भारताकडून 36 कसोटी सामने खेळले असून त्यामध्ये त्यानं 34.6 च्या सरासरीनं 2 हजार 6 धावा केल्या आहेत.

सलामीला रोहित शर्मा, केएल राहुल, तर मधल्या फळीत चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, यष्टिरक्षक म्हणून ऋषभ पंत, फिरकीपटू म्हणून रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, तर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी  मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह यांच्याकडे सोपवली जाऊ शकते. वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी हा भारताचा संभाव्य संघ मानला जातोय.  हा संघ अंतिम सामन्यात खेळला तर निश्चितच हा संघ भारताला पहिल्या आयसीसी कसोटी चँपियनशिपचे विजेतेपद जिंकू शकतो असं भाकीत क्रिकेट जाणकारांनी व्यक्त केलंय.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

कांगारू खेळाडूंना वाटू लागली कोरोनाची भीती: ‘या’ खेळाडूंनी घेतली आयपीएलमधून माघार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here