आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

कोरोना काळात सर्वचजन आपापल्या घरात बंदिस्त असल्यामुळे वेळ घालवण्यासाठी काहीतरी पहात बसतो.  अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला तुमचा वेळ चांगला जावा यासाठी काही ओटीटी प्लाटफॉर्मवर  असलेल्या भन्नाट सिनेमा आणि  सिरीजविषयी महिती देणार आहोत ज्या तुम्ही एकदा अवश्य पहिल्या पाहिजेत.

द लास्ट हावर (अमेझॉन प्राइम व्हिडिओ):
लास्ट अवर ही एक मजेदार गुन्हेगारीची सिरीज आहे. या सिरीजमध्ये  आपणास थ्रील,सस्पेन्सचा भरपूर अनुभव मिळेल.  या सिरीजमध्ये रायमा सेन आणि रॉबिन तमंग सारख्या कलाकारांना पाहायला मिळेल. यात  संजय कपूर अर्प नावाच्या शहरी पोलिसांची भूमिका साकारत आहे. त्याला मारेकरी शोधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

new google

सिनेमा बंदी  (नेटफ्लिक्स)

 चित्रपट

नेटफ्लिक्स वर रिलीज झालेला हा  तेलगु सिनेमा कमी वेळातच लोकांच्या पसंदीस उतरला आहे.
या तेलगू चित्रपटाची कहाणी एका दुर्गम गावात शूट  केली आहे.  शहरी जीवनातील सुखसोयी विषयी या गावातील लोकांना काहीही माहिती नाही. सिनेमा खूप चांगला आहे.  राज & डी.के. निर्मित सिनेमा बंदी हा सिनेमा उत्कृष्ट आयएमडीबी रेटिंग सह सध्या नेटफ्लिक्सच्या टोप चित्रपटांपैकी  एक आहे. सिनेमा खूप चांगला आहे जर तुम्ही घरी बसून बोर होत असाल तर नेटफ्लिक्सवर जाऊन हा सिनेमा नक्की पाहू शकता.

द वुमन इन द विंडो(नेटफ्लिक्स)

 चित्रपट

२००८ मध्ये आलेली कादंबरी ड वूमन इनद विंडो यावर आधारित असलेला हा सिनेमा काही दिवसापूर्वीच नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आलाय.  या चित्रपटात अण्णा फॉक्सचे जीवन दर्शविले गेले आहे. ज्याला दुर्घटनाग्रस्त कार अपघातामुळे गोराफोबियाचा त्रास होतो. सिनेमा इंग्लीश भाषेत असल्यामुळे  थोडा समजायला अवघड जाईलपरंतू सबटायटलच्या सहाय्याने तुम्ही हा सिनेमा नक्कीच पाहू शकता.

यस गॉड यस  (अमेझॉन प्राइम व्हिडिओ):

 चित्रपट

२०१९ मध्ये रीलीज झालेला हा कॉमेडी सिनेमा तुम्ही मनोरंजनाच्या दृष्टीकोनातून नक्कीच पाहू शकता. टिपिकल सिनेमाच्या बाहेर येऊन काहीतरी वेगळ करण्याचा प्रयत्न याच्या निमित्ताने निर्मात्यांनी केला होता.
हा एक मजेदार चित्रपट आहे.  करेन मन यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा रसिकांवर फारसा प्रभाव टाकण्यास अपयशी ठरला होता. परंतु कहीतरी वेगळेपण पहायचं म्हणून हा सिनेम तुम्ही नक्कीच पहा. सिनेमाने  उत्कृष्ट आयएमडीबी रेटिंग मिळावली आहे.

 

द गर्लफ्रेंड एक्सपीरियंस सीजन 3 (लायन्सगेट प्ले):

 चित्रपट

गर्लफ्रेंड एक्सपीरियन्सचा पहिला आणि दुसरा हंगाम प्रेक्षकांना चांगलाच आवडला. या चित्रपटाची निर्मिती अकाडमी पुरस्कार विजेता चित्रपट निर्माता स्टीव्हन सोडरबर्ग यांनी केली आहे. या सिरीजचा तिसरा सीजन रिलीज करण्यात आला आहे. १० एपिसोडचा हा सीजन एखाद्या बिग बजेट सिनेमापेक्षाही जास्त खर्चिक आहे.

तुम्हाला हे तिसरे सीजन नक्कीच आवडेल यात काही शंकाच नाही. लायन्सगेट प्ले या ठिकाणी तुम्ही ही सिरीज पाहू शकता.

 

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

कांगारू खेळाडूंना वाटू लागली कोरोनाची भीती: ‘या’ खेळाडूंनी घेतली आयपीएलमधून माघार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here