आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

कोणतेही प्रशिक्षण न घेता आयफोनवर शूट केलेला हा पहिला मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस!


 

इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर आपल्या स्वप्नांना मार्गी लावण्याचे काम प्रत्येकजण करत असतो. यात प्रत्येकाला यश अपयशाच्या पायऱ्या देखील चढायला लागतात. यशापयाच्या समीकरणावर लढणारी लढाई ही नक्कीच उंच शिखरावर घेऊन जाते. असेच शिखर सातारा जिल्ह्यात येणाऱ्या वाई तालुक्यातील बावधन गावच्या एका नवोदित तरुणाने गाठला आहे. सिनेमा बनवण्याच्या वेडापायी त्याने चक्क आयफोनवर सिनेमा चित्रित केला आहे.

दिग्दर्शन, पटकथा लेखन, सिनेमॅटोग्राफी, संकलन या चारही भूमिका जबाबदारीने पार पाडत दिगंबर वीरकर ‘पिच्चर’ या सिनेमातून पेक्षकांच्या भेटीस आला आहे. आयफोनवर चित्रित होणारा हा पहिला वहिला ‘पिच्चर’ सिनेमा ‘वीरकर मोशन पिक्चर्स’निर्मित असून दिग्दर्शक दिगंबर वीरकर दिग्दर्शित आहे. सिनेमाची आवड जोपासत दिग्दर्शकाने आशयघन कथेसह हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे.

new google

कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण न घेता चित्रित करण्यात आलेला या चित्रपटाची कथा अधिकच उत्सुकता वाढवणारी आहे. आयुष्यात कोणत्या गोष्टीला किती प्राधान्य द्यायचे यावर थोडक्यात चित्रपटाची कथा वळण घेते. आयफोनवर चित्रित होऊन प्रदर्शित झालेला हा ‘पिच्चर’ चित्रपट गाण्यांशिवाय गावाकडील नजाखत उंचीवर नेत आहे. नवोदित कलाकारांच्या जीवन संघर्षाची गाथा असा आशयघन विषय हाताळणारा ‘पिच्चर’ हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवेल यांत शंकाच नाही.

या चित्रपटात जगदीश चव्हाण, राम गायकवाड, महेश आंबेकर, ऐश्वर्या शिंगाडे, अंकिता नरवणेकर, गणेश वीरकर, महेश्वर पाटणकर, कुशल शिंदे, सीमा निकम, सीमा वर्तक, सोनाली विभुते, रविकिरण दीक्षित, अविनाश धुळेकर या कलाकारांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाला केदार दिवेकर याने पार्श्वसंगीत दिले असून चित्रपटाचे साउंड डिझायनिंग निखिल लांजेकर याने केले आहे.

 चित्रपट

सिनेमा एमएक्स प्लेअरवर मोफत पाहता येणार.

-दिगंबर वीरकर, दिग्दर्शक

याबाबत चित्रपटाचे दिग्दर्शक दिगंबर म्हणाले की, “सिनेमा हे माध्यम माझ्यासाठी नवीनच आहे. हे असे माध्यम आहे जे आपल्यातल्या कलागुणांना जोपासण्याचे बळ देते. माझ्यातल्या कलागुणांना सर्वांसमोर आणण्यासाठी सिनेमा हे एक मोठे माध्यम मला मिळाले आहे. तसेच चित्रपटाच्या निर्मितीसाठी महेश्वर पाटणकर, सचिन गोविंदवाड, निलेश साळुंखे, मंगेश हाबडे, श्रीकांत निकम या माझ्या  मित्रांचा खारीचा वाटा आहे. आयफोनवर चित्रित केलेला हा ‘पिच्चर’ सिनेमा एमएक्स प्लेअरवर मोफत प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

कांगारू खेळाडूंना वाटू लागली कोरोनाची भीती: ‘या’ खेळाडूंनी घेतली आयपीएलमधून माघार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here