या पक्षीप्रेमी कुटुंबाने पक्षी संवर्धनासाठी कृत्रिम घरटी बनवून राज्यभर पोहोचवलेत…!


 

सोलापूर : पक्षांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात येतोय. त्यामुळे नैसर्गिक जीवन साखळीला धोका निर्माण झाला आहे. यासाठी पक्षांना निवारा मिळावा म्हणून सोलापुरातील एक कुटूंब कृत्रिम घरटी बनवून ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱयात पोहोचवित आहेत. चिमणी संवर्धनासाठी झटणार्‍या शेटे कुटुंबाची ही कहाणी.

पक्षी

शहरातील चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला या शाळेतील मुकुंद शेटे हे पक्षी प्रेमी शिक्षक. पेशाने शिक्षक असले तरी चिमणी या पक्षांविषयी त्यांना खूप जिव्हाळा. वाढत्या सिमेंटची जंगले, मोबाइल टॉवर, झाडांची घटती संख्या, पक्ष्यांच्या अधिवासावर होणारा आघात यामुळे या पक्षांची संख्या घटत असल्याचे शेटे यांच्या निदर्शनास अाले. काहीही करून चिमणी वाचली पाहिजे हीच त्यांची मनोमन इच्छा होती. यासाठी काहीतरी करावे हा विचार त्यांच्या मनात घोळत होता.

पक्ष्यांच्या प्रेमापोटी त्यांनी सुरुवातीला घराच्या परिसराभोवती अन्न आणि पाण्याची सोय करून ते तहान-भूक भागवायचे. याच दरम्यान २०१० साली इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील वैभव जाधव या पक्षी मित्रांची त्यांची ओळख झाली आणि चिमणी संवर्धनासाठी योग्य कृत्रिम घरटी कोपरा संकल्पना अवगत झाली. सुरुवातीला श्री शेट्टे यांनी ही कृत्रिम घरटी आपल्या बॉम्बे कॉलनी परिसरात लावली. त्यानंतर परसबाग, घरातील पोर्च बगीचा येथेही ही घरटी बसवली.

new google

पक्षी

आज त्यात पक्षी वास्तव्य करतात. शिवाय पिलांना जन्म देतात. पक्ष्यांनी ही घरटी स्वीकारली. शेटे यांनी आजपर्यंत २ हजार पेक्षा जास्त चिमणीची घरटी स्वतः तयार करून मोफत वाटली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या या घरट्यांमध्ये आज चिऊताईची किलबिलाट ऐकू येतोय. कृत्रिम घरटी ठेवलेल्या ठिकाणी आज चिमण्यांनी परिसर गजबजून गेलाय. आज लोक स्वतःहून घरट्यांची मागणी करतात. इतरांसारखे घरटे आपल्याकडेही असावे असे अनेकांना वाटत आहे.

विशेषत: लहान मुलांमध्ये पक्षी आणि पर्यावरणाबद्दल जिव्हाळा निर्माण होत आहे. हेच त्यांच्या कामाचे फलित असल्याचे शेटे यांनी सांगितले. एखादा पक्षी संकटात सापडला की, त्याच्या मदतीसाठी शेटे धावून येतात. पक्ष्यांना जर का जखम झाली असेल तर त्याच्यावर वैद्यकीय उपचार करण्यासाठी ते स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करतात. पक्षी बरा झाल्यास त्याला पुन्हा ते निसर्गाच्या सानिध्यात सोडून देतात. पक्ष्यांची सेवा करण्यातच शेटे यांना विशेष आनंद मिळतो.

 

कृतिम घरट्यात वाढतोय पक्ष्यांचा वावर-  मुकुंद शेटे पक्षी मित्र

अर्धा फूट अंतराची पुठ्ठयाची नळी तयार करून ती एका बाजूने चिकटपट्टीने बंद केली जाते. दुसऱ्या बाजूने अर्धवट बंद करून ही कृत्रिम घरटी झाडांना अडकवली जाते. पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होत चालला असल्याने कृत्रिम घरट्याच्या माध्यमातून तो निवारा जपण्याचा प्रयत्न मी अाणि माझे कुटुंब करतय. चिमणी हा पक्षी वाचविणे काळाची गरज आहे. या कृत्रिम घरटय़ांमध्ये आज पक्ष्यांचा वावर वाढला आहे. परिसर गजबजून जातोय. असंख्य घरटी आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मोफत वाटली आहेत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

कांगारू खेळाडूंना वाटू लागली कोरोनाची भीती: ‘या’ खेळाडूंनी घेतली आयपीएलमधून माघार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here