आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

मधल्या फळीतून क्रिकेटकारकीर्द सुरुवात करणारे हे भारतीय फलंदाज झाले यशस्वी सलामीवीर !


 

आज भारतीय संघ ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी पोहचण्यात भारताच्या अनेक दिग्गज खेळाडूंचा हात आहे.  भारतीय क्रिकेटमध्ये एकापेक्षा एक अनुभवी फलंदाज आहेत ज्यांनी खूप मोठे योगदान दिले आहे. भारतातील असे बरेच फलंदाज आहेत ज्यांनी लोअर किंवा मिडल ऑर्डरपासून क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात करून जगातले सर्वोत्तम सलामीचा फलंदाज बनले.

new google

एकदिवसीय क्रिकेट इतिहासातील तीन ओपनर्सविषयी आज आपण माहिती घेणार आहोत ज्यांनी लोअर ऑर्डर किंवा मिडल ऑर्डरपासून आपल्या कारकीर्दीची सुरूवात भारताकडून केली होती. पण संधी मिळताच सलामीला खेळत त्यांनी धमाका केला आणि आज सर्वात यशस्वी सलामीवीरांमध्ये त्यांचा समावेश आहे. या फलंदाजांवर एक नजर टाकूया.

भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून अोळखला जाणार्‍या सचिन तेंडुलकरने संपूर्ण क्रिकेट जगात एक जबरदस्त एकदिवसीय सलामीवीर म्हणून एक ओळख निर्माण केली होती. सचिन तेंडुलकरने तब्बल 24  वर्षे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले.  त्यामध्ये त्याने भारतीय संघाच्या फलंदाजीमध्ये सलामीवीरची जबाबदारी बराच काळ पार पडली.फलंदाज

आपल्या कारकिर्दीत सचिन  एक महान सलामीवीर होता, यात दुमत नाहीत. पण त्याने 1989 मध्ये मधल्या फळीत आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. सचिनने पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी बाहेर आला आणि शून्यच्या स्कोअरवर बाद झाला. पण 1993 मध्ये सचिनला न्यूझीलंडविरूद्ध सलामीला खेळण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर काय घडले हे सर्वांना माहिती आहे.

सध्या भारतीय क्रिकेट संघात सलामीवीरची भूमिका साकारणार्‍या रोहित शर्माच्याही सुरुवातीच्या टप्प्यात मोठा उतार-चढाव राहिला होता. रोहितचे 2007 मध्ये मध्यल्या फळीतील फलंदाज म्हणून पदार्पण झाले. त्याला आयर्लंडविरूद्ध 7 व्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली; पण तो फारशी चमक दाखवू शकला नाही.

फलंदाज

यानंतर रोहित शर्माला एकदिवसीय मालिकेत फारशी संधी मिळाली नाही, त्यानंतर 2011 मध्ये पहिल्यांदाच त्याला वन डेमध्ये सलामीची संधी मिळाली. इथूनही रोहितला यशाची संधी मिळाली नाही, पण 2013 पासून रोहित शर्माला सतत एकदिवसीय मालिकेत सलामीची संधी मिळाली आणि आज रोहित शर्मा वनडे क्रिकेटमधील महान सलामीवीरांच्या यादीत आला आहे. यासह त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतक ठोकले आहेत.

फलंदाज

भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग बर्‍याच वर्षांपासून भारताचे प्रतिनिधित्व करीत होता.  1999. मध्ये वीरेंद्र सेहवागने एकदिवसीय सामन्यातून कारकीर्दीची सुरुवात केली. मधल्या फळीत फलंदाजीसाठी आलेल्या वीरेंद्र सेहवागला पदार्पणाच्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात फक्त 1 धावा करता आल्या.

यानंतर वीरेंद्र सेहवागला संघातून वगळण्यात आले. परंतु सन 2000 मध्ये वीरेंद्र सेहवागला सचिनच्या अनुपस्थितीत संघासाठी फलंदाजी करण्याची संधी मिळाली. यानंतर सेहवागने मागे वळून पाहिले नाही आणि तो भारताचा सर्वात यशस्वी सलामीवीर म्हणून जागतिक क्रिकेटमध्ये आपला धाक निर्माण केला होता.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

कांगारू खेळाडूंना वाटू लागली कोरोनाची भीती: ‘या’ खेळाडूंनी घेतली आयपीएलमधून माघार

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here