आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

===

आतापर्यंत या 3 खेळाडूने वर्डकपमध्ये गोल्डन बॅट जिकलीय..!


 

प्रत्येक क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूचे एक मोठं स्वप्न म्हणजे आपल्या देशाकडून एकतरी वर्ल्डकप खेळणे. त्यासाठी प्रत्येक क्रिकेटर खूप मेहनत घेत असतो. भारतीय क्रिकेट संघात देखील असे अनेक खेळाडू आहेत जे सध्या वर्ल्डकपच्या तयारीत आहेत. परंतु वर्ल्डकपमध्ये सर्वांनाच संधी मिळणे शक्य नसते.

गोल्डन बॅट
वर्ल्डकपचा प्रवास त्या खेळाडूसाठी तरं आणखीनच चांगला होतो ज्यांना वर्ल्डकपचा बेस्ट पुरस्कार ‘गोल्डन बॅट’ मिळतो. गोल्डन बॅट सर्वांत जास्त रन बनवनाऱ्या खेळाडूला तर जास्त विकेट घेणाऱ्या खेळाडूला ‘गोल्डन बॉल’ हा पुरस्कार दिला जातो.

new google

भारतीय संघात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या चांगल्या प्रदर्शनाने वर्ल्डकप मध्ये हे पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत.

भारतीय संघाने 2 वेळा आयसीसी वर्ल्डकप आपल्या नावावर केला आहे. तर एक वेळा भारताला अंतिम सामन्यात हार माणावी लागली होती. चला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते खेळाडू ज्यांनी वर्ल्डकपमधील सर्वांत बेस्ट पुरस्कार असणारा ‘गोल्डन बॅट’ पुरस्कार प्राप्त केला आहे.

वर्ल्डकपमध्ये ‘गोल्डन बॅट’ जिंकणारे खेळाडू

सचिन तेंडुलकर

 

क्रिकेटचा देवता म्हणून ओळख असलेला मराठमोळा खेळाडू सचिन तेंडुलकरने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक मोठे पराक्रम केले. १९९६ च्या वर्ल्डकपमध्ये सचिनने सर्वांत जास्त धावा केल्या होता. त्यासाठी त्याला ‘गोल्डन बॅट’ पुरस्कार मिळाला होता. सचिनने या वर्ल्डकपमध्ये केवळ 7 सामन्यात 523 धावा बनवल्या होत्या.
ज्यात 2 शतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. सचिन हा पहिला भारतीय खेळाडू आहे ज्याने वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदा ‘गोल्डन बॅट’ जिंकली होती. सचिन असा खेळाडू आहे ज्याने हा पुरस्कार दोन वेळा जिंकला.

राहुल द्रविड:

कसोटी क्रिकेटमध्ये ‘द वॉल’ मानल्या जाणाऱ्या राहुल द्रविडने वनडे क्रिकेटमध्ये सुद्धा आपला झेंडा गाडला होता. द्रविड खेळताना हळू -हळू केव्हा त्यांचे 50 रन्स पूर्ण व्हायचे हे कळायचे सुद्धा नाही.. 1999च्या विश्वकप स्पर्धेत द्रविडने 8 सामन्यात 461 धावा केल्या. ज्यात 2 शतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. या विश्वकपमध्ये सर्वांत जास्त धावा करणारे 3 फलंदाज भारतीय होते. ज्यात द्रविड, गांगुली आणि सचिन यांचा समावेश होता. इंग्लंडमध्ये झालेल्या या विश्वकपस्पर्धेत राहुल द्रविडने ‘गोल्डन बॅट’ जिंकली होती.

गोल्डन बॅट

रोहित शर्मा :

सध्याचा भारतीय संघाचा सलामीवीर हिटमॅन रोहित शर्मा हा सुद्धा या यादीमध्ये सामील झाला आहे.2019 मध्ये झालेल्या विश्वकप स्पर्धेत रोहितने आपल्या कामाचा डंका वाजवला होता. स्पर्धेत प्रत्येक संघाचा गोलंदाजास रोहितने अक्षरशा झोडपून काढले होते. या विश्वकप स्पर्धेत रोहितने 8 सामन्यात 648 धावा काढल्या होत्या. यात त्याने ५ शतक आणि एक अर्धशतक केले होते. शर्माच्या या खेळीमुळे त्याला 2019च्या विश्वकप स्पर्धेत मानाचा ‘गोल्डन बॅट’ पुरस्कार मिळाला होता.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

पंजाब किंग्जचा फलंदाज निकोलस पुरनच्या नावावर ‘या’ लाजिरवाण्या विक्रमाची झाली नोंद…

लोकप्रियतेत शाहरुख खानला टक्कर देतोय हा दाक्षिणात्य हिरो:  पायलट म्हणून करतोय काम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here