आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

या वृक्ष सैनिकांनी काढले झाडांवरील एक लाखांहून अधिक खिळे, राज्यातील झाडांना खिळेमुक्त करण्याचा ध्यास!


वस्तू आणि सेवांची जाहिरात करण्यासाठी अलीकडे झाडांवर पोस्टरच्याद्वारे खिळे ठोकून जाहिरात करण्याचे प्रमाण वाढले आहे. पण यामुळे होणारे झाडांचे विद्रुपीकरण थांबविण्यासाठी आणि त्यांचे आयुष्यमान वाढविण्यासाठी ‘अंघोळीची गोळी’ या संस्थेने खिळेमुक्त झाड हे अभियान हाती घेतले. गेल्या तीन वर्षांत या संस्थेने वृक्षसैनिकांच्या मदतीने राज्यातील २० हजार झाडांमधून एक लाखांहून अधिक खिळे काढली आहेत. यामुळे आज हजारो झाडांनी मोकळा श्वास घेतला आहे.

भारतीय शास्त्रज्ञ डॉ. जगदीशचंद्र बोस यांनी आपल्या संशोधनात झाडांना संवेदना असतात असे सांगितले. झाडे सजीव असतात. मात्र ती बोलत नाहीत किंवा व्यक्त होऊ शकत नाहीत. मात्र त्यांचं विश्वचं वेगळं असतं. त्यांना इजा झाली की तेही रडत असते. त्यांनाही प्रचंड वेदना नक्कीच होत असतात. त्यांच्या या वेदना कमी करण्यासंदर्भात काम निश्चित झाले आणि प्रवास सुरु झाला तो एका अनोख्या स्वातंत्र्यलढ्याचा. अंघोळीची गोळी संस्थेच्या वृक्ष सैनिकांनी झाडांना स्वातंत्र्य देण्याचा लढा सुरू केला आणि तो आजही गेल्या तीन वर्षांपासून चालू आहे.

१ एप्रिल २०१८ साली माधव पाटील यांच्या संकल्पनेतून ‘अंघोळीची गोळी’ या संस्थेमार्फत ‘खिळेमुक्त झाड’ हे अभियान पुण्यातून सुरू झाले. झाडांच्या संवेदनाचा वेदना तितक्याच तीव्रतेने समाजापुढे मांडण्याचे, झाडांनाही जगण्याचा अधिकार असतो, हे वास्तवपणे सांगण्याचे आणि झाडांवर प्रेम करायला शिकवण्याचं काम संस्थेनं केलं आहे. झाडांना ठोकलेली खिळे, बॅनर, पोस्टर, वायर, मुळाशी असलेले सिमेंट काँक्रीट किंवा डांबर, खराब झालेले ट्रीगार्ड का काढून अनेक झाडांना संजीवनी दिली आहे.

new google

झाड

अंघोळीची गोळी संस्थेमार्फत पाणी बचत जनजागृती, खिळेमुक्त झाडं मोहीम, आळेयुक्त झाडं, प्लास्टिकच्या बदल्यात रोपटी, डोंगराला आग लागली पळा पळा, लिफ्टशी तह केला मी, एक कण, मामाच्या गावाला जावू या, पॅरिस करार पाठिंबा असे अनेक उपक्रम राबविले जात आहेत. एकंदरीतच क्लायमेट ऍक्शन या विषयांवर काम करत आहे.

वृक्षसैनिक मांडताहेत झाडांचे प्रश्न 

राज्य समन्वयक तुषार वारंग म्हणाले की, अत्यंत कमी संसाधनांच्या मदतीने ही लढाई लढली जात आहे. वृक्षसैनिक शक्य त्या मार्गाने हा लढा लढत आहेत. या लढाईत अनेक शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था जोडल्या जाताहेत. हा लढा अजून व्यापक होणे गरजेचे आहे. कारण वृक्ष संवर्धन हेच ग्लोबल वॉर्मिंगला प्रभावी उत्तर आहे. गावागावांत, प्रत्येक शहरांत वृक्षसैनिक निर्माण होण्याची गरज आहे. आपले सरकार ऍप किंवा ट्विटर सारख्या माध्यमांतून वृक्षसैनिक झाडांचे प्रश्न मांडताहेत. प्रशासनाने अधिक प्रभावीपणे कायद्यांची अंमलबजावणी केली तर नक्कीच हा लढा यशस्वी होईल.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

कांगारू खेळाडूंना वाटू लागली कोरोनाची भीती: ‘या’ खेळाडूंनी घेतली आयपीएलमधून माघार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here