आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

षटकार ठोकण्यात विराट, रोहितलपेक्षाही पुढे असणारा न्यूझीलंडचा हा गोलंदाज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिपच्या अंतिम सामन्यात खेळणार..!


कसोटी क्रिकेट म्हणजे संयमाने खेळायचा खेळ. मात्र काही खेळाडू याला अपवाद असतात. ते कसोटीतही तुफान फलंदाजी करत षटकारांचा पाऊस पाडतात. यात न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रँडन मॅक्क्यूलम अव्वल स्थानी असला तरी सध्या खेळणाऱ्या दिग्गज फलंदाजाना न्यूझीलंडचा गोलंदाज टीम साऊदीने पछाडलं आहे. इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स पहिल्या क्रमांकावर असून टीम साऊदी देखील काही षटकरांच्या फरकानेच दुसऱ्या स्थानी विराजमान आहे.

न्यूझीलंड

टीम साउदीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिपच्या अंतिम सामन्यात खेळण्याने नक्कीच न्यूझीलंडचा संघ चांगला खेळ करणार यात शंका नाही. साउदी फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये चांगल्या प्रकारे खेळ करू शकतो. एकंदरीत त्याच्या खेळावर न्यूझीलंडच्या संघाला बऱ्याच अपेक्षा आहेत. आता या आपेक्षेवर टीम साउदी किती खरा उतरतो हे पाहणे रंजक ठरेल.

new google

न्यूझीलंड

इंग्लंडला विश्वचषक 2019 जिंकवून देण्यात महत्त्वाची खेळी करणाऱ्या बेन स्टोक्सने सध्या खेळणाऱ्या खेळाडूंच्या तुलनेत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. त्याने 71 कसोटी सामन्यांत 130 डावांत 79 षटकार ठोकले आहेत. स्टोक्सनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे न्यूझीलंडचा गोलंदाज टीम साऊदी. टीमने 77 सामन्यांत 109 डावांत 73 षटकार उडवले आहेत. विराट, रोहित शर्मा, वॉर्नर यांसारख्या फलंदाजाना ही इतके षटकार मारता आलेले नाहीत.

त्यानंतर नंबर येतो श्रीलंकेचा अष्टपैलू आणि माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूजचा. मॅथ्यूजने 90 कसोटी सामन्यांत 161 डावांत 63 षटकार ठोकले आहेत. मॅथ्यूजनंतर भारताचा सलामीवीर रोहित शर्मा येतो. शर्माने 38 कसोटी सामन्यांत 63 डावांत 59 षटकार लगावले आहेत. रोहित सर्वांत जलदगतीने 50 षटकार पूर्ण करणारा भारतीय आहे.

न्यूझीलंड

रोहितनंतर सर्वाधिक षटकार मारलेत, ते ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने. त्याने 86 कसोटींत 159 डावांत 56 षटकार ठोकले आहेत.यानंतर नंबर लागतो, न्यूझीलंड संघाचा सर्वांत अनुभवी फलंदाज रॉस टेलरचा. टेलरने 105 कसोटी सामन्यांत 183 डावांत 53 षटकार खेचले आहेत.

दरम्यान सध्या खेळत असलेल्यांमध्ये 50 षटकार लगावणाऱ्यांमध्ये शेवटी नंबर लागतो भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाचा. जाडेजाने 51 कसोट्यांत 73 डावांत 60 षटकार ठोकले आहेत. विराटचा विचार करता त्याने 91 कसोटी सामन्यांत केवळ 22 षटकार लगावले आहेत.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

भारतीय सेना अधिकारी सांगून केली तब्बल 17 मुलींची फसवणूक….घातला 80 करोड रुपयांना गं

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here