आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

गरिबांच्या पोटाला पोटभर अन्न देणारी ‘आस्था रोटी बँक’ लॉकडाऊनकाळातही देतेय गरिबांना आधार!


 

सोलापूर :  बँक म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर आपसुकच पैसा येतो. पण आम्ही ज्या बँकेविषयी सांगत आहोत, ती बँक पैशांची नसून गरीबांच्या पोटाला पोटभर अन्न देणारी बँक आहे. सोलापूर शहरात गेल्या अडीच वर्षांपूर्वी आस्था सामाजिक संघटने अंतर्गत विजय छंचुरे यांनी आस्था रोटी बँकेची स्थापना झाली. या रोटी बँकेमार्फत गोर गरीब-निराधार लोकांना एकवेळच्या जेवणाची व्यवस्था केली जाते.

आस्था रोटी बँक

new google

आजही कित्येक लोकांना एकवेळच्या जेवणाची भ्रांत आहे. पाणी पिऊन त्यांना दिवस काढावे लागत असते. समाजात एकीकडे अन्नाचा तुटवडा भासतेय तर दुसरीकडे अन्न वाया जात आहे. हे वाया जाणारे अन्न गरजूपर्यंत पोचविण्याचे काम आस्था रोटी बँक गेल्या अडीच वर्षांपासून करत आहे. संस्थेच्या माध्यमातून मागील वर्षापासून लॉकडॉऊनच्या काळातही अनेक गरिबांना अन्नदान केले. त्यामुळे अनेकांची उपासमारी टळली. कोरोनग्रस्त रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याने हॉस्पिटलबाहेर थांबलेल्या त्यांच्या नातेवाईकांना देखील दोन वेळचं जेवण पुरवले जाते.

शहरात वाढदिवस, लग्न समारंभ, साखरपुडा असे अनेक कार्यक्रम होतात. या कार्यक्रमातून शिल्लक राहिलेले अन्न टाकून न देता गरजू निराधार लोकांच्यापर्यंत पोहचवू ते आम्हाला द्या असे, अावाहन आस्था रोटी बँकेने नागरिकांनी केले. आस्था रोटी बँकेने दिलेल्या हाकेला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देत शिल्लक राहिलेले अन्न देणे सुरू केले. शहरात जे एकवेळ उपाशी पोट राहून जीवन काढतात अशा निराधार, बेघर लोकांना या अन्नाचे वाटप केले जाते. अन्न घेण्यापूर्वी ते चांगले आहे का नाही?याची तपासणी केली जाते आणि त्यानंतर असते लोकांना दिले जाते.

शिल्लक अन्न आम्हाला द्या आम्ही गरजूंपर्यंत पोहचवू –विजय छंचुरे (आस्था रोटी बँक)

अन्न हे परब्रह्म आहे ते वाया जाऊ नये. आजही अनेक लोक अन्नाअभावी उपाशी पोटी राहून दिवस काढतात. ते उपाशी राहू नयेत यासाठी आम्ही आस्था रोटी बँकेच्या वतीने अन्नदान करण्याचे काम करतो. लोकांनी लग्न समारंभ तसेच विविध कार्यक्रमात शिल्लक राहिलेले अन्न आम्हाला द्यावे, आम्ही गरजू लोकांपर्यंत पोहोचवू. गरजू लोकांपर्यंत अन्न पोचवण्याचे काम मोठ्या ऊर्जेने ही संस्था करत आहे. शहरातील जवळपास आठशेहून अधिक लोकांना रोज अन्नदान केले जाते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here