आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

कॉन्स्टेबल झाला एसीपी; ज्यांना म्हणायचा तो ‘सर’ आज तेच ठोकतात त्याला सॅल्यूट!


 

पंधरा वर्षांपूर्वी एक मुलगा दहावी 51 टक्के गुण मिळवून पासून पुन्हा अकरावीच्या परीक्षेत फेल झाल्यानंतर पुन्हा बारावीत 58 टक्के गुण मिळवत पास झाला आणि दिल्ली पोलिसमध्ये भरती होऊन शिपाई झाला ही त्यांच्यासाठी मोठी कामगिरी आहे.

कॉन्स्टेबल

new google

यानंतरही तो अभ्यास आणि मेहनत सुरू ठेवला आणि 10 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर एक पोलीस शिपाई आता यूपीएससीची परीक्षा पास होऊन आयपीएस झाला आहे. ही कहाणी आहे फिरोज आलम नावाच्या एका पोलीस शिपायाची. ज्यांनी नुकतीच युपीएससीची परीक्षा पास होऊन आयपीएस झाला आहे.

फिरोज आलम यांचा 31 मार्च 2021 हा दिल्ली पोलिसात हवालदार म्हणून शेवटचा दिवस होता. दुसर्‍याच दिवशी जेव्हा ते खांद्यावर एक स्टारने भरलेला गणवेश घालून एसीपी म्हणून दिल्ली पोलिस दलात पुन्हा सामील झाले. फरक इतकाच की त्याचा सहकारी कॉन्स्टेबल जो त्याला ‘भाई’ म्हणत असे तो आता त्याला ‘सर’ म्हणत होता आणि दहा वर्षांपासून ते ज्यांना ‘सर’ म्हणायचे, आता तेच त्यांना सॅल्यूट मारतात.

आपल्यात जिद्द आणि आवड असेल तर नक्कीच यश मिळेल.  त्याचे उदाहरण म्हणजे दिल्ली पोलिसांचे फिरोज आलम.  फिरोज आलम मूळचे उत्तर प्रदेशातील हापूरचे आहेत.  घरात पाच भाऊ आणि तीन बहिणी आहेत. त्यांचे वडील मोहम्मद शहादत कबाडी म्हणून काम करायचे. पूर्व दिल्लीतील पांडव नगर पोलिस ठाण्यात तैनात निरीक्षक मनीषकुमार यादव यांना ते आपला आदर्श मानत.

2008 मध्ये बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर जून 2010 मध्ये ते दिल्ली पोलिसात शिपाई म्हणून दाखल झाले.  त्यांनी लहानपणापासूनच स्वप्न पाहिले होते की एक दिवस ते पोलिसांचा गणवेश परिधान करील, यासाठी तयार केली आणि जेव्हा ते गणवेश परिधान केला तेव्हा वाटले की ही केवळ एक सुरुवात आहे.

अधिकार्‍यांची कार्यपद्धती व कौशल्ये पाहिल्यानंतर त्यांनीही अधिकारी होण्याचे ठरविले व त्यासाठी मनापासून तयारी करण्यास सुरवात केल्याचे फिरोज सांगतात. यावेळी त्यांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि ‘अधिकारी’ होण्यासाठी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्याचा प्रयत्न करत राहिले. पहिल्या दोन प्रयत्नात ते प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाही.

कॉन्स्टेबल

त्यानंतर तीन वर्षांनंतर त्याने पूर्व परीक्षा उत्तीर्ण केली, परंतु पुढच्या टप्प्यात यश मिळू शकले नाही. अशी एक संधी आली की फिरोजच्या प्रयत्नांना यश येऊ लागले. अनेक अपयशानंतर 2019 मध्ये त्यांनी सहाव्या प्रयत्नात यूपीएससीची परीक्षा दिली.

दिल्ली पोलिस युपीएससी फॅमिलीच्या नावाखाली त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर एक ग्रुप बनविला असून यूपीएससी परीक्षेची तयारी करत असलेल्या 58 कॉन्स्टेबल या ग्रुपचे सदस्य आहेत.  ज्यांना अभ्यासाशी संबंधित मदतीची आवश्यकता आहे त्यांना ते मदत देत आहेत.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

कांगारू खेळाडूंना वाटू लागली कोरोनाची भीती: ‘या’ खेळाडूंनी घेतली आयपीएलमधून माघार

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here