आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

किस्सा! एक धाव काढल्यानंतर राहुल द्रविड शतक ठोकल्यासारखा करु लागला सेलिब्रेशन; अन् प्रेक्षक वाजवू लागले टाळी


भारतीय क्रिकेट संघाची भिंत समजल्या जाणारा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड हा अत्यंत गंभीर आणि शांत स्वभावाचा फलंदाज मानला जात होता. तुम्ही त्याला कधी वादात अडकलेले पाहिले नसेल.  द्रविड कसोटी क्रिकेटमध्ये खूपच चांगला खेळायचा. आज आम्ही तुम्हाला अशीच एक घटना सांगणार आहोत, जेव्हा द्रविडने आपले खाते उघडण्यासाठी इतका वेळ घेतला की, स्टेडियममधील प्रेक्षक थक्क झाले आणि द्रविडने त्या क्षणाचाही कसा सामना केला याची माहिती पाहूया.

Rahul Dravid: The greatest servant of Indian Cricket

new google

वास्तविक असे झाले की, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात द्रविड धावा करण्यासाठी धडपडत होता. संघर्ष इतका चालला होता की 40 चेंडू खेळूनही या फलंदाजाने अद्याप खाते उघडलेले नव्हते.  दरम्यान, चाहत्यांनी त्याच्यावर मजेदार कमेंट्स करण्यास सुरवात केली. अखेरीस द्रविडने 41 व्या चेंडूवर आपले खाते उघडले. यावर प्रेक्षक टाळ्यांच्या कडकडाटात हसायला लागले. जणू द्रविडने शतक पूर्ण केले होते.

काही चाहत्यांनी राहुल द्रविडला अभिवादन करण्यासाठी त्यांच्या आसनांवरुन उभे राहण्यास सुरुवात केली, पण द्रविडलाही परिस्थिती आणि त्याच्यावरील दबाव समजला, त्याने ही एक मजेदार मार्गाने या क्षणाचा आनंद घेतला आणि प्रेक्षकांना मजेदार पद्धतीने प्रतिसादही दिला.

द्रविडने आपली बॅट हवेत उंचावली आणि प्रेक्षकांचे अभिवादन स्वीकारले, यावेळी तो फक्त 1 धावा करू शकला. शतक किंवा अर्धशतक नाही. तरीही द्रविडला क्रिकेट चाहत्यांनी टाळ्या वाजवून त्याला प्रोत्साहन देण्याचे काम केले. आज राहुल द्रविड निवृत्तीनंतर भारतीय ‘अ’ संघ आणि 19 वर्षांखालील संघाचा प्रशिक्षक म्हणून काम करतोय. त्याच्या मार्गदर्शनाखाली अनेक युवा खेळाडू भारतीय संघात एन्ट्री केल्यानंतर दमदार कामगिरी करत आहेत.

राहुल द्रविड

आपल्या कारकिर्दीत द्रविडने 344 एकदिवसीय सामन्यांमध्ये 71.24 च्या स्ट्राईकसह 40  वेळा नाबाद राहात 10 हजार 889 धावा केल्या आहेत. या दरम्यान द्रविडने 12 शतके आणि 83 अर्धशतके झळकावली.  द्रविडने 164 कसोटी सामन्यांच्या 286 डावात 13 हजार 288 धावा केल्या आहेत. सर्वात मनोरंजक बाब म्हणजे द्रविड एकदिवसीय मालिकेत 57 वेळा, तर कसोटीत 52 वेळा बोल्ड झाला आहे.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

कांगारू खेळाडूंना वाटू लागली कोरोनाची भीती: ‘या’ खेळाडूंनी घेतली आयपीएलमधून माघार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here