आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

शाहिद आफ्रिदीनंतर पाकिस्तानचा ‘हा’ कर्णधार करणार त्यांच्या बहिणीसोबत लग्न!


भारताच्या फलंदाजीचा मजबूत आधारस्तंभ म्हणजे विराट कोहली. त्याचप्रमाणे बाबर आजम हा पाकिस्तानच्या फलंदाजीचा मजबूत आधारस्तंभ आहे. अनेक क्रिकेट तज्ज्ञ आणि पाकिस्तानचे समर्थक, बाबर आझम याला पाकिस्तानचा विराट कोहली देखील म्हटले जाते. बाबरला पाकिस्तानच्या तिन्ही फॉर्मेटचा कर्णधारही बनवण्यात आले आहे. तो सर्व फॉर्मेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे.

Babar Azam: Tanveer Ahmed Says Babar Azam Needs To Improve His Personality  And English - पूर्व पाकिस्तान गेंदबाज ने कहा, 'बाबर आजम को अपनी अंग्रेजी  सुधारनी होगी' - Navbharat Times

बबर आजमने आपल्या चुलत बहिणीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र ‘जिओ न्यूज’ ने असे सांगितले आहे की, आझमचे कुटुंबीय आणि त्याच्या काकाच्या कुटूंबाने लग्नाच्या विषयावर सहमती दर्शविली आहे. पुढील वर्षी दोघांचे लग्न होणार आहे. पाकिस्तानी कॅप्टननेही चुलत बहिणीला आपला साथीदार बनवण्यास सहमती दर्शविली आहे. असे म्हणतात की, पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनेही आपल्या चुलत बहिणीबरोबर लग्न केले होते.

new google

एक दिवस आधी अझर अलीने लग्नाचा सल्ला दिला होता

विशेष म्हणजे एक दिवस आधी पाकिस्तानचा माजी कर्णधार अझर अलीने आझमला लग्न करण्याचा सल्ला दिला होता. अलीला एका चाहत्याने विचारले की, सध्याच्या कर्णधारासाठी काही सल्ला आहे का? यावर अलीने उत्तर दिले की, ‘लग्न कर.’

शाहिद आफ्रिदी
बाबर आझमची क्रिकेट कारकीर्द शानदार

बाबर आझमने 80 एकदिवसीय सामन्यात 56.84 च्या सरासरीने 3808 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 88.7 झाला आहे. त्याचबरोबर त्याने आतापर्यंत 13 शतके आणि 17 अर्धशतके ठोकली आहेत.

टी -20 क्रिकेटमध्येही बाबर आझमने 54 सामने खेळले आहेत आणि 47.33 च्या सरासरीने 2035 धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत पाकिस्तानकडून 33 कसोटी सामन्यांमध्ये 42.53 च्या सरासरीने 2169 धावा केल्या आहेत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

सुरेश रैनाची धडाकेबाज खेळी; कोहली-रोहित च्या ‘या’ विक्रमाची केली बरोबरी! 

शिष्याने गुरुला हरविले: आयपीएलमध्ये दबंग दिल्ली कॅपिटल्स पुढे चेन्नई सुपरकिंग्ज झाली चीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here