आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

WTC Final: आकडे सांगतात विल्यमसन-बोल्ट नव्हे तर ‘हा’ खेळाडू ठरू शकतो भारतीय संघासाठी घातक!

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये भारतीय संघाचा सामना न्यूझीलंड संघाशी होणार आहे. हा सामना 18 ते 22 जून दरम्यान साऊथॅम्प्टनमधील द रोज बाउल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. जगभरातील चाहते या सामन्याबद्दल खूप उत्सुक आहेत. या सामन्यात जर भारतीय संघाला विजय मिळवायचा असेल तर न्यूझीलंडच्या खेळाडूशी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

विल्यमसन

साऊथी हा भारतीय संघासाठी मोठा घातक ठरू शकतो

टीम साऊथी हा अनुभवी स्विंग गोलंदाज आहे. या वेगवान गोलंदाजाला इंग्लंडची खेळपट्टीही आवडते. हा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनसारख्या आउट स्विंग गोलंदाजीतही माहिर आहे.  या वेगवान गोलंदाजाला खेळपट्टीकडून थोडी मदत मिळाली तर हा गोलंदाज भारतीय फलंदाजांसाठी मोठा धोका ठरू शकतो.  पूर्वीही या वेगवान गोलंदाजाने भारतीय फलंदाजांना खूप त्रास दिला होता.

new google

टीम साऊथीचा भारताविरुद्ध शानदार विक्रम

विल्यमसन

भारतीय संघाविरूद्ध टिम साऊथीची कामगिरी खूप प्रभावी आहे. या वेगवान गोलंदाजाने भारताविरुद्ध एकूण 8 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 24.46 च्या उत्कृष्ट सरासरीने एकूण 39 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने भारताविरुद्ध एका सामन्यात 64 धावा देऊन 7 विकेट घेतल्या आहेत. या वेगवान गोलंदाजाची चेंडू बरीच स्विंग करण्याची कला आहे, ज्यामुळे त्याने नेहमीच भारतीय फलंदाजांना त्रास दिला आहे.

77 कसोटींमध्ये  घेतले 302 बळी

न्यूझीलंड संघाकडून त्याने 77 कसोटी सामन्यात 28.71 च्या सरासरीने 302 बळी घेतले आहेत. तसेच संघ टीम देखील खालच्या फळीत फलंदाजीसाठी प्रसिध्द आहे. या खेळाडूला 13 वर्षे कसोटी क्रिकेट खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. कर्णधार केन विल्यमसनचा देखील टीम साऊथीवर खूप विश्वास आहे. वास्तविक जेव्हा जेव्हा न्यूझीलंडच्या संघाला विकेटची आवश्यकता असते तेव्हा कर्णधार प्रथम टीम साऊथीकडे पहातो.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

सुरेश रैनाची धडाकेबाज खेळी; कोहली-रोहित च्या ‘या’ विक्रमाची केली बरोबरी! 

शिष्याने गुरुला हरविले: आयपीएलमध्ये दबंग दिल्ली कॅपिटल्स पुढे चेन्नई सुपरकिंग्ज झाली चीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here