आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब
===
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू टाकणारे हे आहेत 3 खेळाडू; एक आहे भारतीय गोलंदाज!
क्रिकेटच्या कोणत्याही स्वरूपात गोलंदाजी करणे खूप महत्त्वाचे असते. कसोटी, एकदिवसीय किंवा टी -20 क्रिकेटच्या प्रत्येक स्वरूपात संघ गोलंदाजांवर बरीच अवलंबून असतो. असे म्हणतात की, जर तुम्ही एखादा सामना जिंकू इच्छित असेल तर फलंदाज जिंकू शकतात, परंतु जर तुम्हाला एखादी मालिका किंवा मोठी स्पर्धा जिंकण्याची इच्छा असेल तर गोलंदाजांनी चांगली कामगिरी करणे आवश्यक असेल. चांगली गोलंदाजी केल्याशिवाय आपण मोठी स्पर्धा जिंकू शकत नाही.

आतापर्यंत अनेक गोलंदाजांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटविला आहे. वसीम अक्रम, कोर्टनी वॉल्श, वकार युनूस, शोएब अख्तर, झहीर खान, अनिल कुंबळे, शेन वॉर्न, मुथय्या मुरलीधरन, ग्लेन मॅकग्रा, ब्रेट ली या दिग्गज खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर गोलंदाजीमध्ये आपला चांगलाच दबदबा निर्माण केला होता. आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर फलंदाजांमध्ये एक धाक निर्माण करत अनेक विक्रम स्वत: च्या नावे केले होते.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम श्रीलंकेचा माजी दिग्गज खेळाडू मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. यासह मुरलीधरनने आपल्या कारकिर्दीत सर्वाधिक चेंडू टाकण्याचा विक्रम देखील केला आहे. आज आम्ही तुम्हाला अशा तीन गोलंदाजाची माहिती देणार आहोत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 हजारपेक्षा जास्त चेंडू फेकले आहेत.
शेन वॉर्न
ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज शेन वॉर्न या यादीत तिसर्या क्रमांकावर आहे. तो मुथय्या मुरलीधरननंतर कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक विकेट घेणारा आहे. शेन वॉर्नने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसह एकूण 339 सामने खेळला आहे. या काळात 1001 बळी घेतले. या 339 सामन्यांत शेन वॉर्नने एकूण 51 हजार 347 चेंडू फेकले. यादरम्यान त्याने 25 हजार 536 धावाही दिल्या. त्याने 38 वेळा 5 विकेट्स आणि 10 वेळा 10 विकेट्स घेण्याचा पराक्रमही साध्य केला. निवृत्तीनंतर शेन वॉर्न आयपीएल आणि बीबीएल सारख्या टी 20 लीगमध्ये खेळताना दिसून आला. तो काही काळ राजस्थान रॉयल्सचा प्रशिक्षक, खेळाडू तसंच मेंटर म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली आयपीएलचे पहिले जेतेपद राजस्थान रॉयल्सला पटकावले होते.
अनिल कुंबले
माजी भारतीय कर्णधार अनिल कुंबळे या यादीत दुसर्या क्रमांकावर आहे. अनिल कुंबळे हा मुथय्या मुरलीधरन आणि शेन वॉर्ननंतर कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक विकेट्स (619) आहे. अनिल कुंबळेने 1990 ते 2008 या काळात एकूण 403 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि या दरम्यान 956 बळी घेतले. या दरम्यान कुंबळेने 55 हजार 346 चेंडू टाकले आणि 28 हजार 767 धावा दिल्या. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने 37 वेळा 5 बळी आणि 8 वेळा 10 बळी घेतले. निवृत्तीनंतर अनिल कुंबळे याने भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली होती. मात्र विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यात वाद झाल्यानंतर अनिल कुंबळेने प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता.
मुथैया मुरलीधरन
श्रीलंकेचा माजी दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन या यादीत पहिल्या स्थानावर आहे. तो कसोटी क्रिकेटमधे सर्वाधिक विकेट्स (800) घेतल्या आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही त्याने सर्वाधिक चेंडू टाकले आहेत. मुरलीधरनने 1992 ते 2011 पर्यंत एकूण 495 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि यावेळी त्याने 63 हजार 132 चेंडूत गोलंदाजी केली. या काळात मुथय्या मुरलीधरनने 30 हजार 803 धावा दिल्या आणि एकूण 1347 बळी घेतले. त्याने कारकीर्दीत 77 वेळा 5 बळी आणि 22 वेळा 10 बळी घेतले आहेत. निवृत्तीनंतर मुरलीधरन आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. सध्या तो सनरायजर्स हैदराबाद संघाला प्रशिक्षण देतोय.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हेही वाचा: या ३ सोप्या उपायांनी चेहऱ्यावरील पिंपल घालवा आणि मिळवा तेजस्वी चेहरा!
तेव्हा राशिद पटेल आपल्या सहकारी खेळाडूला मारण्यासाठी स्टम्प घेऊन मैदानावर धावत सुटला होता