Reading Time: 2 minutes

आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स ऍण्डरसनने कसोटीत केला ‘हा’ विक्रम; आता सचिनचा खुणावतोय विक्रम


इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणार्‍या कसोटी सामन्यात आणखी एक विक्रम नोंदविला. इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळणार्‍या खेळाडूंच्या यादीत अँडरसनने अ‍ॅलिस्टर कुकची बरोबरी केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या सामन्यात त्याने हा विक्रम केला. लंडनमधील लॉर्ड्स येथे आजपासून इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना खेळला जात आहे.

जेम्स ऍण्डरसन

जेम्स अँडरसनने आज इंग्लंडकडून 161 वा कसोटी सामना खेळला. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणार्‍या दुसर्‍या कसोटी सामन्यात जर तो खेळला तर तो इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा खेळाडू होईल. अँडरसनबद्दल सांगायचे तर त्याने आतापर्यंत कसोटी सामन्यात 614 बळी घेतले आहेत.  वेगवान गोलंदाज म्हणून तो जगातील सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू आहे. 38 वर्षांचा अँडरसन प्रथम श्रेणी कारकीर्दीत 1 हजार विकेट घेण्यापासून अवघ्या 8 गडी दूर आहे.

सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने भारताकडून 200 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग आणि स्टीव्ह वॉ168 कसोटी सामन्यासह दुसर्‍या क्रमांकावर आहे. यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या कॅलिसने 166, वेस्ट इंडिजचा चंद्रपॉल आणि भारताचा राहुल द्रविडने 164 कसोटी सामने खेळले आहेत.

 जेम्स ऍण्डरस

बुधवारी दोन्ही संघांदरम्यान खेळल्या जाणार्‍या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात जेम्स ब्रेसी आणि ऑली रॉबिनसन यांना इंग्लंडकडून पदार्पण करण्याची संधी मिळत आहे. डेव्हन कॉनवे न्यूझीलंडकडून पदार्पण करीत आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा: या ३ सोप्या उपायांनी चेहऱ्यावरील पिंपल घालवा आणि मिळवा तेजस्वी चेहरा!

तेव्हा राशिद पटेल आपल्या सहकारी खेळाडूला मारण्यासाठी स्टम्प घेऊन मैदानावर धावत सुटला होता!

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना फलंदाजीचा गुरुमंत्र देणारा ‘हा’ खेळाडू झाला मुंबई क्रिकेट संघाचा प्रशिक्षक  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here