Reading Time: 2 minutes

आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना फलंदाजीचा गुरुमंत्र देणारा ‘हा’ खेळाडू झाला मुंबई क्रिकेट संघाचा प्रशिक्षक


रणजी ट्रॉफीमधील महान दिग्गज आणि मुंबईचा माजी कर्णधार अमोल मजूमदार यांची मंगळवारी आगामी स्थानिक सत्रासाठी मुंबई वरिष्ठ संघाचा प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली.  भारताच्या ज्येष्ठ महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्त झालेल्या रमेश पवार यांच्या जागी मजूमदार हे स्थान घेतील. जतीन परांजपे (अध्यक्ष), निलेश कुलकर्णी आणि विनोद कांबळी यांचा समावेश असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) क्रिकेट सुधार समितीने (सीआयसी) मजूमदार यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला.

खेळाडू

सीआयसीने बलविंदरसिंग संधू, वसीम जाफर, साईराज बाहुले, सुलक्षणा कुलकर्णी, प्रदीप सुंदरम, नंदन फडणीस, उमेश पटवाल आणि विनोद राघवन यांच्यासह इतर आठ उमेदवारांचीही मुलाखत घेतली. चार महिन्यांपूर्वी मुंबईच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत भारताचा माजी ऑफस्पिनर पवार यांनी अमोल मुजुमदार यांना पाठीमागे टाकत प्रशिक्षक झाले होते. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईने मागील हंगामात विजय हजारे ट्रॉफीचे जेतेपद जिंकले होते, पण त्यांची अाता भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता.

मुंबईचा दिग्गज खेळाडू मुजुमदार यांनी 1993 ते 2013 दरम्यान 171 प्रथम श्रेणी सामन्यात 11 हजार 167 धावा केल्या.  सेवानिवृत्तीनंतर क्रिकेट समालोचकाची भूमिकेत दिसणाऱ्या  मुजुमदार यांनी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी आणि इंडियन प्रीमियर लीग मधील राजस्थान रॉयल्स या संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. तसेच भारताविरुद्धच्या 2019-20 च्या मालिकेमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या अंतरिम फलंदाजी प्रशिक्षकपदीही म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

खेळाड

मुंबई क्रिकेट असोसिएशन आता या नव्या प्रशिक्षकाला वार्षिक मानधन म्हणून 50 लाख रुपये देणार आहे. यापूर्वीच्या प्रशिक्षकांना जवळपास 15-20 लाख रुपये मिळायचे. इतकी मोठी रक्कम एमसीए पहिल्यांदाच एखाद्या प्रशिक्षकाला देत आहे. या शर्यतीमध्ये साईराज बहुतुले आणि वसीम जाफर हे दोन दिग्गज खेळाडू देखील प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते. या दोघांनाही मागे टाकत अमोल मुजुमदार यांनी  बाजी मारली.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा: या ३ सोप्या उपायांनी चेहऱ्यावरील पिंपल घालवा आणि मिळवा तेजस्वी चेहरा!

तेव्हा राशिद पटेल आपल्या सहकारी खेळाडूला मारण्यासाठी स्टम्प घेऊन मैदानावर धावत सुटला होता!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here