आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

‘या’ 2 भारतीय गोलंदाजांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात घेतलेत 50 हून अधिक बळी


 

भारतीय क्रिकेट संघात प्रत्येक फॉरमॅटमध्ये अनेक धुरंधर गोलंदाज येऊन गेले आहेत. यातील काही दिग्गज खेळाडू टेस्ट स्पेशालिस्ट होते, तर काहींना वनडे स्वरूप अधिक आवडले.  परंतु टी 20 फॉर्मेट क्रिकेटमध्ये आल्यापासून गोलंदाजांना गोष्टी फार कठीण झाल्या आणि या फटाफट क्रिकेटमध्ये विकेट घेणे हे एकमेव लक्ष्य बनले.

गोलंदाज

new google

या काळात भारतीय संघासाठी असे अनेक गोलंदाज आहेत. ज्यांनी एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये बर्‍याच विकेट घेतल्या आहेत आणि आपल्या नावे अनिक विक्रम केले आहेत. परंतु या लेखात आम्ही अशा 2 भारतीय गोलंदाजांविषयी बोलणार आहोत ज्यांनी तीनही फॉर्मेटमध्ये (कसोटी, एकदिवसीय आणि टी 20) भारतासाठी 50 हून अधिक विकेट्स मिळवणारे एकमेव 2 खेळाडू आहेत.

रविचंद्रन अश्विन

तामिळनाडूचा 34 वर्षीय ज्येष्ठ भारतीय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने 2010 मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या हरारे येथे झालेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द सुरू केली होती. त्यानंतर तो भारतासाठी एकूण 78 कसोटी, 111 एकदिवसीय आणि 46 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे.

गोलंदाज

या सामन्यांमध्ये अश्विनने शानदार गोलंदाजी करताना 409 कसोटी विकेट, 150 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय विकेट आणि 52 टी -20 आंतरराष्ट्रीय विकेट घेतल्या आहेत. या अर्थाने, अश्विन हा भारताच्या त्या 2 गोलंदाजांपैकी एक आहे ज्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारात 50 पेक्षा जास्त बळी आहेत.

जसप्रीत बुमराह

27 वर्षीय अहमदाबादचा युवा भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने जानेवारी 2016 मध्ये सिडनी एकदिवसीय मालिकेत भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द सुरू केली. त्यानंतर तो भारतासाठी एकूण 19 कसोटी सामने, 67 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि 50 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे.

गोलंदाज

या सामन्यांमध्ये त्याने 22.10 च्या सरासरीने 83 कसोटी विकेट्स घेतल्या आहेत. 25.33 अशा सरासरीने 108 वनडे तर टी 20 मध्ये 59 विकेट घेतले आहेत. अशाप्रकारे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारात 50 पेक्षा जास्त बळी घेणारा अश्विननंतर बुमराह हा दुसरा गोलंदाज आहे.

दोन्ही खेळाडूंचे पुढील लक्ष्य आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल

या दोन्ही हुशार भारतीय गोलंदाजांचे पुढील लक्ष्य भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे अंतिम लक्ष्य आहे. इंग्लंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत त्याच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याने मॅन ऑफ द सीरिजचे विजेतेपद जिंकले आहे. तर त्याचवेळी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या भारतीय संघाच्या कसोटी मालिकेत बुमराहनेही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा: या ३ सोप्या उपायांनी चेहऱ्यावरील पिंपल घालवा आणि मिळवा तेजस्वी चेहरा!

तेव्हा राशिद पटेल आपल्या सहकारी खेळाडूला मारण्यासाठी स्टम्प घेऊन मैदानावर धावत सुटला होता!

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना फलंदाजीचा गुरुमंत्र देणारा ‘हा’ खेळाडू झाला मुंबई क्रिकेट संघाचा प्रशिक्षक  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here