आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

‘यॉर्कर स्पेशलिस्ट’ जसप्रीत बुमराहची नजर कपिल देव यांच्या ‘या’ विक्रमावर; करु शकतो सर्वात वेगवान शतक !


भारतीय संघ सहा कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंड दौर्‍यावर आहे. भारताचा पुरुष व महिला क्रिकेट संघ आज इंग्लंडला रवाना होतील. इंग्लंडच्या परिस्थितीत भारतीय वेगवान गोलंदाज गोलंदाजी कशी करतात यावर या संपूर्ण दौर्‍यावरील भारताचा विजय अवलंबून असेल. तर येथे सर्वांची नजर मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह यांवर असेल. या दौर्‍यावर बुमराहचे लक्ष्य एका विशेष विक्रमावर असेल. त्याला येथे भारताचा दिग्गज अष्टपैलू कपिल देव यांचा विक्रम मोडण्याची चांगली संधी आहे.जसप्रीत बुमराह

या दौर्‍यावर बुमराहने आणखी 17 बळी घेतले तर 100 विकेट घेणारा वेगवान गोलंदाज होऊ शकतो. सध्या बुमराहकडे 19 सामन्यांत 83 कसोटी विकेट आहेत. भारतीय वेगवान गोलंदाजांमध्ये  सर्वात कमी कसोटीत 100 विकेट घेण्याच्या वेगवान गोलंदाजाबद्दल विचार केला तर हा विक्रम कपिल देवच्या नावावर आहे. त्यांनी अवघ्या 25 कसोटी सामन्यांमध्ये भारतासाठी 100 कसोटी विकेट्स पूर्ण केले होते. दुसरीकडे वेगवान 100 विकेट घेण्याचा भारतीय विक्रम अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विनच्या नावावर आहे. त्याने फक्त  19 सामन्यात शंभर बळी घेण्याचा विक्रम केला होता.

या सर्व खेळाडू व्यतिरिक्त इरापल्ली प्रसन्ना 20, अनिल कुंबळे 21, सुभाष गुप्ते 22, विनू मंकड 23 आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांनी 24 कसोटी सामन्यांमध्ये 100 कसोटी विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. त्याचबरोबर इरफान पठाणने 28 कसोटी सामने खेळून असा पराक्रम केला आहे, तर सध्याच्या संघात समाविष्ट असलेल्या मोहम्मद शमीने 29 कसोटी सामने खेळल्यानंतर 100 कसोटी विकेट पूर्ण केली आहेत.

new google

जसप्रीत बुमराह

इंग्लंडमधील हवामान आणि वेगवान गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्ट्या पाहता जसप्रीत बुमराह हा विक्रम करू शकेल असा अंदाज क्रिकेट तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. बुमरहा हा भारताचा यॉर्कर स्पेशालिस्ट म्हणून ओळखला जातो. या हुकमी गोलंदाजाने  आपल्या भेदक गोलंदाजीच्या जिवावर भारताला अनेक सामने जिंकून दिले आहेत. इंग्लंड दौऱ्यावर त्याच्यावर  भारताला विजय मिळवून देण्याची मोठी जबाबदारी असेल.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा: या ३ सोप्या उपायांनी चेहऱ्यावरील पिंपल घालवा आणि मिळवा तेजस्वी चेहरा!

तेव्हा राशिद पटेल आपल्या सहकारी खेळाडूला मारण्यासाठी स्टम्प घेऊन मैदानावर धावत सुटला होता!

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना फलंदाजीचा गुरुमंत्र देणारा ‘हा’ खेळाडू झाला मुंबई क्रिकेट संघाचा प्रशिक्षक  

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here