आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

बाबर आजम पूर्वी या तीन क्रिकेटपटूंनी केले होते आपल्या चुलत बहिणीशी लग्न !


बाबर आजमने आपल्या चुलतबहिणीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नाच्या बाबतीबाबत आझमच्या कुटुंबामध्ये आणि त्याच्या काकाच्या कुटुंबात एकमत झाले आहे. पुढील वर्षी दोघांचे लग्न होणार आहे.  क्रिकेट इतिहासात असे अनेक दिग्गज क्रिकेटपटू आहेत ज्यांनी त्यांच्या चुलतबहिणीबरोबर लग्न केले.

बाबर आजम

आपल्या चुलतबहिणीशी लग्न करण्याची ही बातमी वाचून आपल्याला आश्चर्य वाटले असेल की हे कसे शक्य आहे. परंतु आम्ही आपणाला सांगू, मुस्लिम धर्मात याची परवानगी आहे. आज आम्ही तुम्हाला त्या 3 क्रिकेटपटूंबद्दल सांगणार आहोत ज्यांनी आपल्या चुलतबहिणीशी लग्न केले आहे.

शाहिद आफ्रिदी

new google

बाबर आजम

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीनेही आपली चुलत बहीण नादियाशी लग्न केले. शाहीद आफ्रिदीचे लग्न प्रेम प्रकरणातून नव्हे तर, शाहिद आफ्रिदीच्या वडिलांनी दोघांच्या स्वतंत्र इच्छेनुसार लग्न केले. सध्या आफ्रिदी आपल्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहे. त्यांना 5 मुलीही आहेत.

शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानकडून  27 टेस्ट, 398 वनडे, व 98 टी20 सामने खेळला अाहे, जिसमे शाहिद अफरीदी ने टेस्ट क्रिकेट में 36.51 च्या सरासरीने 1716, 398 वनडे सामन्यात  23.57 च्या सरासरीने 8064  व 98 टी-20 सामन्यात 18.01 च्या सरासरीने 1405 धावा केल्या आहेत.

शाहिद अफरीदी कसोटी क्रिकेटमध्ये 48 विकेट, वनडेत 395 विकेट अाणि 98 टी-20 सामन्यात 6.61 च्या शानदार सरासरीने   97 विकेट घेतले आहेत.

सईद अन्वर

बाबर आजम

माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू सईद अन्वरने मार्च 1996 मध्ये आपली चुलतबहिण लुबनाशी लग्न केले जी पेशाने डॉक्टर आहे. या दोघांनाही एक मुलगी, बिस्मा होती, जिचा 2001 मध्ये दीर्घ आजाराने मृत्यू झाला.

ऑगस्ट 2001 मध्ये आशियाई कसोटी स्पर्धेत सईद अन्वरने बांगलादेशविरूद्ध शतक झळकावल्यानंतर दोनच दिवसांनी त्यांची साडेतीन वर्षांची मुलगी बिस्माचा दीर्घ आजाराने मृत्यू झाला. त्यामुळे अन्वर लाहोरला परतला आणि हा त्याचा शेवटचा कसोटी सामना ठरला.  दोन वर्षे तो क्रिकेटपासून दूर राहिला आणि त्यावेळी चर्चेचे हेच कारण होते.

पाकिस्तानकडून सईद अन्वरने 55 कसोटी सामन्यांमध्ये 45.52 च्या सरासरीने 4052 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 11 शतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर 247 एकदिवसीय सामन्यांमध्ये 39.21 च्या सरासरीने 8824 धावा केल्या असून त्यामध्ये 20 शतकेही आहेत.

बाबर आजम

मुस्तफिजूर रहमान

मुस्तफिजूर रहमानने जिच्यासोबत लग्न केले तिचे नाव सामीया परवीन शिमू आहे जी नात्याने त्याची चुलत बहीण लागते.  सामिया परवीन शिमुने ढाका विद्यापीठातून पदवी संपादन केली, मुस्तफिजूरचा भाऊ महफुजुर रहमान यांनी सांगितले की, न्यूझीलंड हल्ल्यानंतर घरी आल्यावर मुस्तफिजूर खूप दुःखी होता, म्हणून आम्ही त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

न्यूझीलंडच्या क्राइस्टचर्चमधील दोन मशिदींमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे बांगलादेशातील काही क्रिकेट खेळाडू मरता-मरता वाचले. वेगवान गोलंदाज बांगलादेशकडून 14 कसोटी सामने, 67 एकदिवसीय सामने आणि 42 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला असून यामध्ये त्याने कसोटीत 30 विकेट्स, एकदिवसीय सामन्यात 124 आणि टी -20 मध्ये 58 बळी घेतले आहेत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा: या ३ सोप्या उपायांनी चेहऱ्यावरील पिंपल घालवा आणि मिळवा तेजस्वी चेहरा!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here