आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

या ३ सोप्या उपायांनी चेहऱ्यावरील पिंपल घालवा आणि मिळवा तेजस्वी चेहरा!


 

कोणालाही त्यांच्या चेहऱ्यावर मुरुम असने  आवडत नाही. याचा अर्थ असा होत नाही कीप्यारत्चायेकाच्याच चेहऱ्यावर मुरूम येणार नाही. आपली इच्छा नसतांना सुद्धा  अनेक वेळा हे मुरूम आपल्या चेहऱ्यावर येऊन आपली सुंदरता कमी करतात. सहज अर्थ असा आहे की आपली इच्छा असल्यास आपण आपल्या चेहर्यावर असलेल्या या मुरुमांना होण्यापासून रोखू शकता. आजच्या या लेखात पाहूया मुरूम  होण्यापासून रोखण्यासाठी आपण काय  करू शकता अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

 पिंपल

new google

शरीराच्या त्वचेवर दिसणारा प्रत्येक परिणाम शरीरावर होणारा प्रभाव दर्शवितो.आपल्या शरीरात कोणतीही समस्या असल्यास, नंतर त्याचा परिणाम शरीराच्या बाह्य अवयवांमध्ये आपल्याला दिसेल. अशा परिस्थितीत आपल्या चेहऱ्यावर  फोड किंवा चेहेर्‍यावर मुरुम असतील तर ते  आपल्यासाठी डोकेदुखी बनू शकते.

तस तर चेहऱ्यावरील डाग धब्बे, पिंपल काढण्यासाठी बाजारात अनेक क्रीम उपलब्ध आहेत. यातील काही परिणामकारक सुद्धा असतील परंतु घरगुती उपायाने जर हा इलाज होत असेल तर पैसे खर्च करून केमिकलयुक्त  क्रीम आपल्या चेहऱ्यावर का लावायच्या? त्यामुळे आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील डाग काढण्याचे ३ घरगुती उपाय सांगणार आहोत. जे नक्कीच तुमच्या कमी येतील.

मुरुमांचे डाग काढून टाकण्याचे 3 मार्ग

टोमॅटोचा रस

होय, टोमॅटो केवळ फायबरचा चांगला स्रोत नसून व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत देखील आहे.यासाठी  एका वाडग्यात दोन चमचे रस, एक चमचे मध आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून पेस्ट बनवा. यानंतर तीस मिनिटे चेहऱ्यावर लावा. आणि त्यांतर कोमट पाण्याने चेहरा नीट धुवून घ्या. ही क्रिया सलग ७ते८ दिवस केल्यास तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल नक्कीच गायब होईल.

पिंपल

लिंबू आणि मध

लिंबू देखील व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे. लिंबाच्या रसामध्ये मध मिसळा आणि दोन्हीचे प्रमाण समान करा.म्हणजे एका संपूर्ण लिंबाचा रस आणि एक चमचा मध मिसळा आणि आपल्रया चेहऱ्यावर लावा. मध आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. या प्रकारे मध आणि लिंबू  वापरून तुम्ही तुमचा चेहरा पिम्पलच्या तावडीतून बाहेर काढू शकता.

हळद आणि दुधाची पेस्ट

पिंपल जास्त वाढत असेल आनि कोणताही उपाय त्यावर जास्त काम करत  नसेल तर एकदा तुम्ही हळद आणि दूधाच पेस्ट करून चेहऱ्यावर लावायला हवे यामुळे नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल.  हळद  आणि दुधाची योग्हेय पेस्ट तयार करून ती कमीतकमी ७ ते ८ दिवस आपल्या चेहऱ्यावर लावा. लावल्यानंतर चेहरा थोडा वेळ सुकू द्या, आणि काही वेळाने कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या.एकदाच तुम्हाला याचा परिणाम दिसणार नाही परंतु ही क्रिया ८/१० दिवस केल्यास तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here