आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

 माजी विद्यार्थ्यांमुळे रुग्णांना मिळतात चार घास सुखाचे;हरिभाई देवकरण प्रशालेच्या १९९१ च्या बॅचमधील विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी!


सोलापूर: सोलापूर शहरात जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरील   कोरोना चे रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात. अशावेळी या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना जेवणाच्या डब्यासाठी मोठी परवड होत होती. काही जवळ पैसे असूनही लॉकडाऊनमुळे जेवण मिळत नव्हते तर काही जणांकडे जेवणांसाठी पैसेही नसायचे. अाज या लोकांच्या मदतीला काही माजी विद्यार्थी धावून आले आहेत. त्यांच्यामुळेच कोरोना रुग्ण आणि नातेवाईकांना या लॉकडाऊन काळात चार घास सुखाचे मिळत आहेत.

 हरिभाई देवकरण

हरिभाई देवकरण प्रशालेमधील १९९१ सालामधील दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने देश-विदेशात स्थायिक झाले. सोलापूरसाठी काहीतरी करावे अशी त्यांची बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती. मात्र त्यांना कामानिमित्त सोलापुरात येऊन मदत करणे जमत नव्हते.  सध्या लॉकडाऊन असल्यामुळे हे अमेरिका, मुंबई, गुजरात, पुणे, काश्मीर या ठिकाणी स्थायिक झालेले जे की मूळचे सोलापूरचे आहेत ते सर्वच माजी विद्यार्थी सोलापुरात एकत्र आले. आणि याच दरम्यान त्यांना समाजकार्याची चांगली संधी चालून आली.

new google

सध्या कोरोना काळात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची दोन वेळच्या जेवणाची परवड होत असल्याचे समजताच त्यांनी या लोकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्याचा निश्चय केला.  शहरात उद्योगवर्धिनी संस्थेच्या माध्यमातून रुग्ण आणि अडचणीत असलेल्या लोकांना भोजन सेवा मिळत असल्याची माहिती त्यांना मिळाली. माजी विद्यार्थ्यांनी या संस्थेशी संपर्क साधून जेवणाचे डबे पुरवायला सुरुवात केली. गेल्या २५ दिवसांपासून रोज दोन वेळचे ४०० डबे पोहचवले जातात. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांच्या जेवणाची व्यवस्था झाल्याने अनेकांची होणारी परवड थांबली आहे.

हरिभाई देवकरण

राजेश नारंग, संतोष चोपडे, अरविंद देशपांडे, धनंजय कुलकर्णी, सचिन नागणे, सचिन मंगळवेढेकर, स्वरूप जोशी, राहुल देशपांडे, प्रसाद हिराळकर, अविनाश पवार, ऋषिकेश कुलकर्णी, अाणि अमोल भोसेकर या माजी विद्यार्थ्यांच्या आर्थिक   सहकार्यामुळे हा समाजोपयोगी उपक्रम यशस्वीपणे पार पाडतोय. लॉकडाऊन संपेपर्यंत ही मदत रुग्णांना देण्यात येणार आहे. केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून ते मदत करत असल्याची भावना माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. माजी विद्यार्थ्यांनी सढळ हाताने दिलेल्या आर्थिक सहकार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोरोनासारख्या महाभयंकर संकटकाळात हरिभाई देवकरण प्रशालेतील माजी विद्यार्थी एकत्र येऊन या गोरगरीब रुग्णांना मदतीचा हात देत आहेत. हा खरंच कौतुकास्पद उपक्रम आहे. या उपक्रमामुळे अनेकांची भूक भागली अाहे. माजी विद्यार्थ्यांमुळेच आज शहरातील अकरा रूग्णालयातील  रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना ‘चार घास सुखाचे’ मिळत आहेत. देश विदेशात राहिले तरी या विद्यार्थ्यांनी सोलापूरशी नाळ तोडली नाही हे या मदतीवरून समजते. या सर्व उपक्रमात केतनभाई व्होरा मित्रपरिवाराचे अमूल्य असे योगदान आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा… करपका विनायक मंदिरातील दोन हात असलेल्या बाप्पांच्या मूर्तीचा इतिहास…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here