आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

दाराजवळच्या पायपुसणी ला देखील आहे महत्त्व; या रंगाची आणि आकाराची असावी तुमची पायपुसणी!


 

प्रत्येक घरात, दरवाजाजवळ पायपुसणी म्हणजेच डोअर मॅट ठेवली जाते. जेणेकरून बाहेरील घाण घरात प्रवेश करू नये. ही पायपुसणी केवळ आपले घर फक्त स्वच्छ ठेवत नाही तर त्याचा योग्य वापर केल्यास आपण घराची नकारात्मक ऊर्जा देखील काढून टाकू शकता. वास्तुनुसार नकारात्मक ऊर्जा पायपुसणीमधून कशी काढली जाऊ शकते आणि पायपुसणीचा रंग आणि आकार काय असावा हे जाणून घ्या …

1. वास्तुनुसार घराचा उंबरठा मोडलेला असू नये. जर तुमच्या दाराच्या उंबरठ्याची मोडतोड झाली असेल किंवा त्यामध्ये क्रॅक असतील तर त्यामुळे वास्तू दोष होतो. ज्यामुळे आपल्या घरात नकारात्मकता येण्यास सुरवात होते आणि आपल्या घरात मतभेद होण्याची परिस्थिती असते. अशा परिस्थितीत घराच्या उंबरठ्यावर आणि जेथे काही भाग तुटलेला आहे त्यावर एक पायपुसणी ठेवा. हे आपल्याला नकारात्मक उर्जेच्या परिणामापासून आराम देते.

new google

पायपुसणी

2. तुमच्या घरात नकारात्मकतेमुळे अशांततेचे वातावरण असेल तर काळ्या कपड्यात थोडासा कापूर बांधा व त्याला पायपुसणीखाली ठेवा. हे आपली नकारात्मकता दूर करेल.  तुमच्या घरात शांतता येण्यास सुरवात होईल आणि कुटुंबात समरसतेची भावना निर्माण होईल.

3. वास्तुशास्त्रानुसार घरात नेहमी आयताकृती पायपुसणी ठेवावेत.

4. घरात नेहमी उत्तर दिशेने हलक्या रंगाची पायपुसणी ठेवा.

5. पूर्वेकडील मुख्य प्रवेशद्वारावर हलकी रंगाची पायपुसणी वापरणे योग्य आहे.

6.घराबाहेरच्या खोल्यांमध्ये ठेवलेल्या पायपुसणीखाली थोडीशी फिटकरी घाला, यामुळे घराची नकारात्मकताही दूर होते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा… करपका विनायक मंदिरातील दोन हात असलेल्या बाप्पांच्या मूर्तीचा इतिहास…!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here