Reading Time: 2 minutes

आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

ड्रीम डेब्यू: लॉर्ड्सच्या मैदानावर जो पराक्रम दिग्गजांना करता आला नाही ते न्यूझीलंडच्या डेव्हिनने दाखविले करून!


न्यूझीलंडचा फलंदाज डेव्हन कॉनवेने लॉर्ड्स येथे सुरू असलेल्या पदार्पणाच्या पहिल्याच कसोटी सामन्यात इतिहास रचला. या मैदानावर पदार्पण सामन्यात दुहेरी शतक ठोकणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला. इंग्लंड विरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी त्याने ही कामगिरी केली. लॉर्ड्स मैदान डेव्हन कॉनवेसाठी स्वप्नवत पदार्पण ठरले. लॉर्ड्समधील पहिल्या कसोटीत त्याने दुहेरी शतक ठोकत आणखी एक विक्रम नोंदविला.

डेव्हिन

इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यात पदार्पणात कोनवे द्विशतक  ठोकणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. इंग्लंडच्या मातीवर जे मोठे दिग्गज आणि महान फलंदाज करू शकत नव्हते ते कॉनवेने करुन दाखविले. त्याने नेत्रदीपक शैलीत षटकार ठोकत आपले दुहेरी शतक पूर्ण केले.  मात्र, 200 धावांच्या पुढे जाता आले नाही आणि तो धावबाद झाला.  कॉनवेने 347 चेंडूंमध्ये 22 चौकार व एका षटकारासह 200 धावा केल्या. कॉनवेने त्याच्या कसोटी सामन्यात अनेक विक्रम नोंदवले.  त्याने गुरुवारी के एस रणजितसिंहजीचा 125 वर्ष जुना विक्रम मोडला.  सन 1896 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पदार्पण सामन्यात रणजितसिंहने 154 धावा केल्या.

डेव्हन कॉनवे कसोटी पदार्पणात दुहेरी शतक झळकावणारा जगातील सहावा तर न्यूझीलंडचा दुसरा खेळाडू ठरला आहे.  न्यूझीलंडच्या सिन्क्लेअरने वेस्ट इंडिजविरुद्ध 1999 मध्ये वेलिंग्टन येथे 214 धावा केल्या. तत्पूर्वी, डेव्हन कॉनवेने लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा 25 वर्ष जुना विक्रम मोडला.

डेव्हिन

गांगुलीने 1996 मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर पदार्पणाच्या कसोटी सामन्यात 131 धावा केल्या. कोनवेने पहिल्या दिवशी नाबाद 136 धावा केल्या. त्याचबरोबर पदार्पणाच्या कसोटी सामन्यात दीडशे धावा करणारा न्यूझीलंडचा तो तिसरा खेळाडू ठरला आहे. डेब्यू सामन्याच्या पहिल्या डावात शतक झळकावणारा कॉनवे हा न्यूझीलंडचा 12 वा फलंदाज आहे.

सामन्यात इंग्लंडकडून पदार्पण करणार्‍या ऑली रॉबिन्सनने सर्वाधिक चार बळी घेतले. त्यांच्याशिवाय जेम्स अँडरसनने 2 आणि मार्क वूडने 3 बळी घेतले. कोनवेच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या डावात 378 धावा केल्या. विशेष म्हणजे बांगलादेश विरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेत कॉनवेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने न्यूझीलंडला स्वबळावर दोन सामने जिंकून दिले. तिसर्‍या वनडे सामन्यात त्याने 126 धावा केल्या. त्याचबरोबर पहिल्या टी -20 मध्ये त्याने 52 चेंडूत 92 धावांची डाव खेळला.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

कांगारू खेळाडूंना वाटू लागली कोरोनाची भीती: ‘या’ खेळाडूंनी घेतली आयपीएलमधून माघार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here