Reading Time: < 1 minute

आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

क्रिकेट धमाका; पाकिस्तान सुपर लीग पुन्हा 9 जून पासून होणार सुरू; या दिवशी होईल अंतिम सामना!


 

पाकिस्तान सुपर लीगची (पीएसएल) 9 जूनपासून अबू धाबी येथे पुन्हा सुरु होईल. या लीगचा अंतिम सामना 24 जून रोजी खेळला जाईल. कराचीमधील जैविक दृष्ट्या सुरक्षित वातावरणात कोविड -19 च्या संसर्गाचे प्रकरण सापडल्यानंतर तीन महिन्यांपूर्वी तहकूब करण्यात आली होती.पाकिस्तान सुपर लीग

पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) गुरुवारी सांगितले की, चौथ्या क्रमांकाची टीम लाहोर कलंदर स्पर्धेच्या 15 व्या सामन्यात तिसर्‍या स्थानावर असलेल्या इस्लामाबाद युनायटेडशी सामना करेल. 24 जून रोजी अंतिम सामना खेळला जाईल.

पाकिस्तानच्या इंग्लंड दौर्‍यापूर्वी ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी  सलग सहा दिवस दोन सामने होतील. त्यापैकी 5 प्राथमिक फेरीच्या असतील. तर सहावा सामना 21 जून रोजी होईल, जेव्हा पात्रता व एलिमिनेटर सामने खेळले जातील.

पाकिस्तान सुपर लीग

बोर्डाने सांगितले की पाकिस्तान सुपर लीग ही 9 जून ते 24 जून दरम्यान अबुधाबी येथे खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघ 25 जून रोजी मँचेस्टरकडे रवाना होईल.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here