Reading Time: 2 minutes

आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

आकडे सांगतात साऊथॅम्प्टनच्या मैदानावर रिषभ पंतची कामगिरी आहे निराशाजनक!


भारतीय संघाला न्यूझीलंड विरुद्ध 18 ते 22 जून दरम्यान न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना साऊथॅम्प्टन येथील द रोझ बाऊल येथे खेळायचा आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये भारतीय संघाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. 2013 नंतर प्रथमच भारतीय संघ आयसीसी स्पर्धा जिंकू शकेल अशी सर्वांची अपेक्षा आहे.  संघाचे युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हे यामागील मुख्य कारण आहे.

Fans Give Such Funny Reply After Rishabh Pant Seeks The Suggestion For New  House - ऋषभ पंत ने नए मकान को लेकर फैंस से मांगे सुझाव, तो मिले ऐसे मजेदार  जवाब

या ऐतिहासिक अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघ इंग्लंडमध्ये हजर आहेत. भारतीय संघ साऊथॅम्प्टनमध्ये असताना न्यूझीलंडचा संघ इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्स येथे एक कसोटी सामना खेळत आहे.

रिषभ पंत सध्या कारकीर्दीच्या सर्वोत्कृष्ट फॉर्मात आहे.  अलीकडच्या काळात त्याने अनेक सामन्यात भारताला विजय मिळवून दिला आहे. भारताला हा अंतिम सामना साऊथॅम्प्टनच्या मैदानामध्ये खेळायचा असला, तरी रिषभ पंतचा रेकॉर्ड द रोज बाउल स्टेडियमवर कसा राहिला आहे हे जाणून सर्वांनाच कुतूहल वाटेल.

आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत रिषभ पंतने साऊथॅम्प्टनमधील रोझ बाउल स्टेडियमवर एकच सामना खेळला आहे.  पंतने इंग्लंडविरुद्ध सन 2018 मध्ये साऊथॅम्प्टन येथे एक कसोटी सामना खेळला होता, जो त्याच्या कारकिर्दीतील दुसरा कसोटी सामना देखील होता. पण या सामन्यात रिषभ पंतचा विक्रम खूपच वाईट होता. पहिल्या डावात पंतने 29 चेंडूंचा सामना केला आणि एकही रन न करता तो बाद झाला. त्याला मोईन अलीने एलबीडब्ल्यू (पायचीत) केले होते.

रिषभ पंत

दुसर्‍या डावातही पंत प्रभावित कामगिरी करण्यात अपयशी ठरला. त्याने 12 चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 18 धावा केल्या. पुन्हा एकदा त्याला मोईन अलीने बाद केले. हा सामना 60 धावांनी भारतीय संघाने गमावला. आता जेव्हा रिषभ पंत साऊथॅम्प्टनमध्ये खेळत आहे, तेव्हा त्याला अधिक अनुभव आहे आणि त्याने फलंदाजीतही बरीच सुधारणा केली आहे. या कारणास्तव, अशी अपेक्षा केली जाऊ शकते की तो या मैदानावर आपली विक्रम सुधारेल आणि भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देईल.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

अधिक वाचा:  किचनमधील  हे मसाले आहेत आरोग्यास लाभदायी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here